पिंपरी दि,०५ : – पुणे भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस कर्मचारी समीर रासकर व सुमीत देवकर गस्त घालत असताना भोसरी पोलिसांनी १० लाखांचा ३० किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली आहे तर त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे. ही कारवाई भोसरी गावठाणातील स्मशान भूमी रोडवर गुरूवारी दि.५ कारवाई करण्यात आली.
उत्तरेश्वर उर्फ बॉक्सर दगडू कांबळे (वय-५४ रा. भोसरी मुळ रा. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आले आहे. तर चंदन राठोड (वय-५५ रा. बीदर कर्नाटक) हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे.
भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी समीर रासकर व सुमीत देवकर यांना दोन इसम स्मशान भूमी रोडवर गांजा विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती मिळाली. होती पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. होता त्यावेळी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर (एमएच १२ एल. जे १९०५) थांबल्याचे दिसली. व पोलिसांना पाहताच राठोड अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिसांनी कांबळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने गाडीची तपासणी केली असता गाडीत १० लाख ७ हजार ९३४ रूपयांचा ३० किलो ४३५ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला.
ही कारवाई पोलीस आयुक्त पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, विपुल जाधव, सुमीत देवकर, समीर रासकर, संतोष महाडीक, विकास फुले, आशिष गोपी, सागर भोसले, बाळासाहेब विधाते यांच्या पथकाने केली.