पुणे दि १८ : –सिंहगड रोड वरिल राहणारा तरुण
इन्स्टाग्रामवर मैत्री केल्यानंतर मैत्रिणींचे मोबाईल क्रमांक देण्यास तरुणीने नकार दिल्यास त्यांचे फोटो घेऊन कॉल गर्ल अशी कमेंट टाकून तिची बदनामी करणाऱ्या तरुणाला सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. इन्स्टाग्रामवरील माहिती लपून राहात नाही . त्यामुळे अशा प्रकारे कोणी फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास तरुणींनी न घाबरता पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सायबर गुन्हे शाखेने केले आहे.
रवी कुमार पासवान (मुळ रा. रोहतास, बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला अटक करून सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.