पिंपरी चिंचवड,दि.२९ : -झुंजार ऑनलाईन – एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार दिल्याने चाकूने वार करून तरुणीचा खून
महाळूंगे एमआयडीसीतील आंबेठाण येथे घडली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीन च्या पथकाने आरोपींना सातारा-कराड रोड येथून अटक केली.
प्राची विजय माने ( वय २१, रा. आंबेठाण, खेड, मूळ- इस्लामपूर, वाळवा ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. अविराज रामचंद्र खरात ( रा. बहे. ता. वाळवा ) याला अटक केली आहे. आंबेठाण येथे मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करुन खून झाल्याची माहिती रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पोलिसांना मिळाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एकतर्फी प्रेमातून आणि लग्नास नकार दिल्याने अविराज याने गळ्यावर व पोटावर चाकूने वार करुन प्राचीचा खून करून तेथून तो पळून गेला होता.
अविराज हा दुचाकीवरून सातारा-कराड रोड येथे जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून अविराज याचा १५ किलोमीटर पाठलाग केला. पोलिसांना पाहताच अविराज पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन मोबाईल संच, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास महाळूंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.