मुंबई दि. १९ :- (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ५७८, माता रमाई महिला मंडळ, पंचशील सेवा मंडळ या तिन्ही मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १३३ जयंती महोत्सव म्हणजेच “भीममहोत्सव २०२४” हा १३ एप्रिल ते १६ एप्रिल २०२४ या चार दिवसांच्या कालावधीत होणारा महोत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी अनेकविध नवनवीन उपक्रम, जल्लोष व फटाक्यांच्या आतिषबाजीत शाखेचे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर मोरे यांच्या अधिपत्याखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला, सदर प्रसंगी शनिवार दि. १३ एप्रिल रोजी जेतवन बुद्धविहार येथे सर्व शाखांच्या पंच पदाधिकारांच्या माध्यमातून राष्ट्रपुरुषांना पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली व धार्मिक पूजाविधी उपासिका योगिता मोरे, उपासक अनंत गोविंद मोहिते यांच्या सुमधुर वाणीने पार पडला, तद्नंतर बाबासाहेबांनी प्रजासत्ताक भारत देशाला बहाल केलेलं संविधान LED Screen द्वारे डिजिटल स्वरूपात निर्माण करून त्या आठ फुटी संविधान LED Screen चे उद्घाटन विभागातील लोकप्रिय कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले; नंतर कार्यक्रमाच्या प्रारंभी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला शाखेच्या वतीने पुष्पहार व फुलांची उधळण करून मानवंदना करण्यात आली, दि. १३ रोजी लहान मुलांकरिता वयोगटानुसार रनिंग, चित्रकला आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, त्यात रनिंग मध्ये ५० व चित्रकलेत १०० बाल-स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, चित्रकला स्पर्धेस अजय कदम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, संध्याकाळच्या सत्रात महिलांसाठी प्रसाद घाग संचालित “पैठणी हा खेळ खेळूया” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात जवळपास ७० हुन अधिक महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता, रात्रीच्या सत्रात फटाक्यांच्या आतिषबाजीत आदर्शांना मानवंदना देऊन कार्यक्रमास अल्पविराम देण्यात आला.
दि. १४ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मउत्सव साजरा करताना सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० या कालावधीत अक्षरा सामाजिक प्रतिष्ठाण यांच्या माध्यमातून युनिकेअर हेल्थ सेंटरच्या वतीने रमेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते त्याअंतर्गत वसाहत व परिसरातील नागरिकांना सर्व शारीरिक वैद्यकीय तपासणी, मार्गदर्शन व उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले, संध्याकाळी साठे वसाहत व परिसरातील सर्व आबालवृद्ध, महिला, पुरुष भीमसैनिक विभागाच्या डोळे दिपून टाकणाऱ्या भव्यदिव्य मिरवणुकीत सहभागी झाले होते, त्याप्रसंगी बाबासाहेबांच्या नातसून मनीषाताई आनंदराज आंबेडकर सहभागी झाल्या रमाई महिला मंडळांच्या वतीने ओवाळणी करून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले मनीषाताईंनी बाबासाहेबांना मानवंदना देत “आपण सर्वांनी ही एकी अशीच कायम ठेवली पाहिजे” असा संदेश दिला, त्यांनतर फटाक्यांच्या आतिषबाजीत व भीमसागराच्या जल्लोषात मिरवणूक आगेकूच करत निघून गेल्यावर कार्यक्रमाला अल्पविराम देण्यात आला.
दि. १५ एप्रिल रोजी दुपारी ३:०० ते सायंकाळी ७:०० या कालावधीत अग्निशमन दलाच्या जवानांनी घरगुती गॅस लिकेज, अपघाती आग, ज्वलनशील वस्तूंचा स्फोट अश्या आपतकालीन स्थितीत आगीवर नियंत्रण आणीत स्वतःचे, स्वतःच्या परिवाराचे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखवत जनजागृती केली, सदर प्रसंगी भायखळा अग्निशमन डिव्हिजन प्रमुख, दादर अग्निशमन डिव्हिजन प्रमुख तसेच अन्य अधिकारी यांची उपस्थिती लाभली होती. रात्रौ १०:०० वाजता विभागीय मुलांचे नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास सिने, टेलिव्हिजन मालिका, व्यावसायिक नाट्य सृष्टीतील नृत्यदिग्दर्शक उमेश देसाई परीक्षक म्हणून लाभले होते, सदर नृत्य कार्यक्रमास जवळपास ४५ संघांनी सहभागी झाले होते.
दि. १६ एप्रिल रोजी कालकथित लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे सुपुत्र व हाडाचे कलावंत संदेश उमप ह्यांनी कलाक्षेत्रातील “The Show Must go on” या बीजमंत्रावर खरे उतरत आईचे निधन झाले असताना ही दिला शब्द पाळत कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या ऑर्केस्ट्रासोबत बहारदार सांगीतिक कार्यक्रम सादर केला तसेच शाखेद्वारे आयोजित सर्व स्पर्धांमध्ये परीक्षकांनी प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीन क्रमांक काढून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
बौद्धजन पंचायत समितीने अत्यंत शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने सदर कार्यक्रम चारी दिवस विविध कार्यक्रम, उपक्रम यांचे आयोजन करून कोणतेही गालबोट लागू न देता मोठ्या उत्साहात व जल्लोषात यशस्वीपणे पार पाडल्याने संपूर्ण मुंबई शहरात विविध स्तरांवर कौतुक करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमास विविध पक्ष त्यांचे कार्यकर्ते, नेते, समाजसेवक यांनी वेळोवेळी भेट देत उपस्थिती लावली; आचारसंहिता असल्याने कोणीही आचारसंहिता भंग पावणार नाही याचे भान ठेवून कोणतेही व्यक्तव्य करणे टाळले व केवळ शुभेच्छापर संदेश देऊन रजा घेतली; शाखेनी उपस्थित पाहुण्यांचे यथोचित सत्कार करून त्यांना सन्मानित केले. शिवडी विभाग गतक्रमांक १३ चे महासचिव संदीप मोहिते, सामाजिक कार्यकर्ते प्रतीक कांबळे, प्रसेन कांबळे त्यांचा ग्रुप, विभागीय कमिटी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवान साळवी आदींनी ही कार्यक्रमास भेट दिली.
सदर भीम महोत्सव – २०२४ हा १३ एप्रिल ते १६ एप्रिल असा चार दिवसांचा भव्यदिव्य कार्यक्रम भूतो न भविष्यती असा कार्यक्रम मूर्त स्वरूपात आणण्यासाठी रमाई महिला मंडळाच्या आजी माजी सर्व कार्यकर्त्यांनी गेली एक वर्षे मेहनत घेऊन संघटन करीत, आर्थिक निधी जमा करीत कंबर कसून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले, पंचशील सेवा मंडळाच्या सर्व आजी माजी कार्यकर्त्यांनी ही जीवाची बाजी लावून सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले व सदर कार्यक्रम कोणतेही गालबोट न लागता शिस्तबद्ध पध्दतीने पार पाडण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली म्हणून कार्यक्रम अध्यक्ष श्रीधर मोरे यांनी शाखेच्या वतीने रमाई महिला मंडळ व पंचशील सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानून सार्वजनिक पुष्पगुच्छ व शाल देऊन सर्वांना सन्मानित केले. तसेच नृत्याविष्कार कार्यक्रमात दीपाली मोहिते, सपना सकपाळ, ज्योती शिर्के, सविता साळवी, उर्मिला गायकवाड, ऋणाली शिर्के, रेषा साळवे, दृतिका मोहिते, आर्या पवार, सौरवी मोरे, मानसी मोरे, तनुषा पवार या सर्व मुलींनी पंधरा दिवस मेहनत घेऊन नेत्रदीपक असा अप्रतिम नृत्याविष्कार सादर करून लोकांची मने जिंकली त्याबद्दल त्यांचेही शाखेच्या वतीने विशेष कौतुक करून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर मोरे व गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी धन्यवाद व्यक्त केले, तसेच विभागातील स्थानिक रहिवासी, मातंग संघटना, शिवशाही प्रतिष्ठाण, साईसेवा मंडळ, अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण हौसिंग सोसायटी आदींचे ही विशेष सहकार्य केल्याबद्दल आभार मानले अश्या प्रकारे हा चार दिवसांचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडून कार्यक्रमाची सांगता केली.