पुणे, दि. २८: दस्त नोंदणीकरीता सह जिल्हा निबंधक वर्ग-१ व मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर या कार्यालयाच्या अधिनस्त असलेली सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-२ हवेली क्र. १ ते २७ कार्यालये २९ ते ३१ मार्च शासकीय सुट्टीच्या कालावधीत सुरु राहणार आहेत.
वार्षिक बाजारमुल्यदर तक्ते १ एप्रिल रोजी प्रसिद्ध होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होते. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना) या संबंधीचे कामकाज करण्यासाठी तसेच दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. सह जिल्हा निबंधक वर्ग-१ व मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर हे कार्यालयदेखील अभिनिर्णय, अभय योजना तसेच इतर कामकाजासाठी सुरु राहणार आहे, अशी माहिती पुणे शहरचे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ व मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिली आहे.