मुंबई,दि.१९ :- लोकसभा निवडणुक. महाराष्ट्रातील राजकारणात सध्याची स्थिती पाहता कोण गड राखेल असे प्रश्न जनतेला आहेच, त्यामुळे तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून काम सुरू झालं आहे.
शिवसेना पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाने एकूण 16 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत तर द.मध्य मुंबईतून अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. तर संभाजीनगरामधून चंद्रकांत खैरे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जवळपास ठरले आहे, अशी वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. यामध्ये विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता विनोद घोसाळकर यांचं नाव समोर आलं आहे.
16 जागांवर कोणा कोणाला संधी देण्यात आली वाचा सविस्तर
१) विनोद घोसाळकर उत्तर मुंबई
२) संजय दिना पाटील इशान्य मु़बई
३) अरविंद सावंत दक्षिण मुंबई
४) अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई
५) चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजी नगर
६) नरेंद्र खेडकर बुलढाणा
७) संजय देशमुख यवतमाळ
८) ओमराजे निंबाळकर उस्मानाबाद
९) बंडु जाधव परभणी
१०) वाघचौरे शिर्डी
११) विजय करंजकर नाशिक
१२) राजन विचारे ठाणे
१३) अनंत गिते रायगड
१४) नागेश अष्टीकर हिंगोली
१५) विनायक राऊत रत्नागिरी- सिंधुदुर्ग
१६) चंद्रहास पाटील सांगली
अद्याप ठरलेलं नाही
१७) कल्याण डोंबिवली
१८) संजोग वाघेरे मावळ
१९) पालघर
२०) जालना
महाराष्ट्रात 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. एकूण लोकसभेसाठी सात टप्प्यात मतदान होणार असून याचा निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात बंडाचं वारं आता वेगानं वाहू लागल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.