पुणे,दि.१४ : – पुणे शहरातील अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. व पुणे पोलीस आयुक्तांचा आदेश झुगारून पुणे शहरातील काही ठिकाणी जुगार अड्डे व काही अवैद्य धंदे सुरू असल्याचे आज उघडकीस आले असून, पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापे टाकून कारवाई केली. या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोकड आणि मोबाइल संच असा ०२ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुणे स्टेशन परिसरात मटका अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून साडेतीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे पत्यांवर जुगार सुरू असल्याचे उघडकीस आले. जुगार अड्ड्यावर कारवाई करून पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतले. जुगार अड्डा मनोज आडे (रा. दांडेकर पूल) चालवित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जुगार अड्ड्याला बाहेरून कुलुप होते. आतमध्ये जुगार खेळण्यात येत होता.
अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, अनिकेत पोटे, पोलीस हवालदार बाबा कर्पे, हनुमंत कांबळे, अजय राणे, इरफान पठाण, अमेय रसाळ, अमित जमदाडे, किशोर आंधळे, इम्रान नदाफ, अजय राणे यांनी ही कारवाई केली