पहिल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात मध्य प्रदेश हॉकी अकादमीच्या संघाने स्पर्धेत दबदबबा कायम करत बलाढ्या हॉकी संघाला 4-2 च्या फरकाने धूळ चारली. मध्यप्रदेशने पेनल्टी कॉर्नरचा मोका साधला खरा पण त्यांच्या प्रयत्नाला चंडीगडच्या रमणदिप या गोलकिपरने तो अडवला. त्यावर चंडीगडच्या हाशिमने चौथ्या मिनीटांत गोल करत आघाडी मिळवली जी मध्यांरापर्यंत कायम राहिले. मध्यांतरानंतर 33 व्या मिनीटांत मध्य प्रदेशच्या आदर्श हर्दुआने केला आणि 1-1 बरोबरी साधली.
दुसऱ्या सामन्यात हॉकी ओडिशाने हॉकी गंगपूर ओडिशाला 3-2 ने मात दिली ज्यात आजय एक्काने सिंगाचा वाटा उचलला आणि नवव्या मिनीटांत गोल करत आघाडी कमावली. त्यानंतर प्रदिप लाक्राने 20 व्या मिनीटांत गोल करुन ही आघाडी 2-0 वर नेली. यामुळे दबाव वाढत असताना गंगपूर ओडिशाच्या सुदिप चिर्माकोने 25 व्या मिनीटांत गोल करत ही आघाडी 2-1 पर्यंत कमी केली. प्रदिपने 28 व्या मिनीटांत गोल करत गुणफलक 3-1 असा केला. दुसऱ्या सत्रात गंगपूर ओडिशाकडुन आलेल्या पुरण केरकेट्टाच्या गोलने गुणतालिका 3-2 वर गेली जी शेवटपर्यंत कायम राहिली.
दिवसाच्या सर्वाधिक दिर्घकाळ चाललेल्या सामन्यात उत्तर प्रदेश हॉकीने भारतीय खेळ प्राधिकरणला 3-2 ने मागे टाकत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. वीसाव्या मिनीटांत पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातुन आघाडी घेतली जी मध्यांतरापर्यंत कायम राहिली. शेवटच्या मिनीटांत गोपीकुमार सोनकरने गोल करुन सामना शुटआऊटमध्ये नेला. त्यामध्येही उत्तरप्रदेशकडुन उत्तम सिंग, अभिषेक कुमार यांनी तर साईच्या नोएल टोप्नो, आनंद एक्काने एक एक गोल केला आणि पुन्हा 2-2 बरोबरी केली. त्यानंतर मिळालेल्या संधीचे सोने करत उत्तर प्रदेशच्या शिवम आनंदने उत्तरप्रदेशला हॉकीला विजयाकडे नेले.
गतवर्षीचे उपविजेते आणि विजेत्यांमध्ये झालेल्या लढतीत उपविजेता हरियाणा संघाने हॉकी पंजाबला 2-0 ने हरवले. सन्नी मलिकने पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये रुपांतरीत करुन 1-0 ची आघाडी घेतली जी हरियाणाने हाफटाईमपर्यंत कायम ठेवली रिमांशूच्या स्टिकमधुन निघालेला गोल निर्णय लावणारा ठरला. दुसरीकडे मध्य प्रदेशने 2013 नंतर पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी चंडीगड हॉकी संघाला 3-2 ने पराभुत केले.
उपउपांत्य फेरीचे निकाल ः
1. मध्येप्रदेश हॉकी अकादमी ः 3 (आदर्श हर्दुआ 33 मि., सौरभ पाशाईन 51 मि., हैदर अली 59 मि.) वि. वि. हॉकी चंडीगड ः 2 (हाशिम 4 मि., हरप्रित सिंग 41 मि.) हाफ टाईम ः 1-0.
2. हॉकी ओडिशा ः 3 (अजय एक्का 9 मि., प्रदिप लाक्रा 20, 28 मि.) वि. वि. हॉकी गंगपूर ओडिशा ः 2 (सुदिप चिर्माको 25 मि., पुरण केरकेट्टा 40 मि.) हाफ टाईम ः 2-2
3. हॉकी हरियाणा ः 2 (सनी मलिक 8 मि., रिमांशू 53 मि.) वि. वि. हॉकी पंजाब ः 0. हाफटाईम ः1-0
4. उत्तर प्रदेश हॉकीः 1,3 (गोपीकुमार 60 मि., उत्तम सिंग, अभिषेक कुमार सिंग, शिवम आनंद) वि. वि. भारतीय खेळ प्राधिकरण ः 1, 2 (रोहित 20 मि., नोयल टोप्नो, आनंद एक्का). हाफटाईम ः 0-1
उपांत्य फेरीच्या लढती ः
मध्येदेश हॉकी अकादमी वि. हॉकी ओडिशा
हॉकी हरियाणा वि उत्तरप्रदेश हॉकी