पुणे,दि.१२:- आताच्या काळात नोकरी नाही तर छोकरी मिळत नाही, असे चित्र पुणे सह महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाहाण्यात मिळत आहे. पुण्यातील काही मुलांच्या पालकांना अनुभव आला आहे काही मुलीच्या आई वडिलांनाची अपेक्षा एवढी वाढली आहे की मुलगा पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीला पाहिजे. मुलाचे लाखोच्या पॅकेज पाहिजे. पुण्यासारखे ठिकाणी स्वतःचं घर पाहिजे. तसेच पुण्यासारख्या ठिकाणी नोकरी करून एकटा राहणारा पाहिजे.? पुण्या सारख्या ठिकाणी स्वतःचे घर व स्वतःच्या व्यवसाय करतोय तरीही नको. स्वतः मालक म्हणून राहतोय तरीही नको. लाखो रुपये महिना कमवतोय पण व्यवसाय करतोय कधीही नुकसान होऊ शकते म्हणून नको. पण त्याला झिरो किंमत आहे अशा मुलांच्या आई-वडिलांनी मुलांच्या लग्नासाठी करायच तरी काय? काही मुलाचे लग्न जमलं तर काही दिवसात मुलांच घटस्फोट होण्याचही पुण्यासारख्या ठिकानी पाहण्यास मिळत आहे.
असाच अनुभव जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांचा मुलाला आला आहे तर एका शेतकरी मुलाने लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने अनोखा आंदोलन केले आहे शेतकरी मुलाला मुलगी द्यायला तयार होत नसल्याने.
पाचोरा (जि.जळगाव) – एका शेतकरी मुलाला मुलगी द्यायला तयार होत नाही. त्यामुळे अनेक सधन शेतकऱ्यांची मुले, शेती काम करणारे तरुण लग्नाविना असल्याचे व त्यातून कौटुंबिक मनस्ताप व कलह वाढीस लागत असल्याचे आपण पाहतो, अथवा ऐकतो.
विवाहासाठी मुलाची निवड करताना त्यास नोकरी असावी, तो एकटाच असावा, आई, वडील व कुटुंबीयांपासून दूर नोकरीस असावा यासोबतच त्यास शेती असावी, अशा अपेक्षा असतात. जर शेतकरी मुलगा लग्नासाठी चालत नाही तर मग मुलाकडे शेती असावी, अशी अपेक्षा का ठेवली जाते? हा यक्षप्रश्न असल्याचा सूरही व्यक्त होतो.
परंतु समाज मनात वाढीस लागत असलेल्या या मनोवृत्तीमुळे सधन शेतकरी अथवा बागायतदारांची मुले व स्वतः शेतीची कामे करणाऱ्या उपवर तरुणांचे विवाह होत नाहीत. या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी नाचणखेडा (ता. पाचोरा) येथील उपवर शेतकरी बागायतदाराने नवरदेवाचा पेहराव करत, कपाळावर मुंडावळ्या (बाशिंग) बांधून पाचोरा येथे केलेले अनोखे आंदोलन शहरवासीयांचे लक्ष वेधणारे ठरले आहे. या आंदोलनाची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे.
नाचणखेडा येथील पंकज राजेंद्र महाले हा उपवर शेतकरी बागायतदार शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या, वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन डोक्यावर टोपी, पांढरा गणवेश व कपाळी मुंडावळ्या बांधत आला व त्याने ‘बागायतदार आहे बागायतदारीण हवी’ असा फलक हातात घेऊन उंचावत अनोखे आंदोलन केले.