पुणे,दि.२३:- श्री संताजी प्रतिष्ठान पुणे कोथरूडच्या वतीने, तेली समाजाच्या वधुवर सुचक केंद्राचे उदघाटन दि.२२ रोजी झाले विवाह संस्थेचे जनक , शामराव भगत व मनोहर डाके यांच्या हस्ते कोथरूड येथे नुकतेच उदघाटन समारंभ पार पडले. याप्रसंगी तुरुंगाधिकारी तेजश्री चिंचकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले मुळशीच्या मा. सभापती उज्वलाताई पिंगळे, पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका सौ निशा करपे, माजी नगरसेविका अश्विनी राऊत, अर्चना खोंड यांना संस्थेच्या विश्वस्त सुनंदाताई जाधव यांनी सन्मानित केले. तेली समाजाचे विश्वस्त दिलीप वावळ, संजय भगत, मिलिंद चव्हाण, रोहिदास हाडके, गणेश पिंगळे, संतोष माकुडे, गणेश देवराय व सांज दैनिक शक्ती,झुंजार न्यूज चॅनल,चे संपादक संतोष राम राम काळे व इत्यादी प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होते. तसेच रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या वधु वर फॉर्म चे प्रकाशनही यावेळेस करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष रमेश भोज यांनी आपल्या भाषणात वधु वर सुचक केंद्र काळाची गरज आहे . मुलींनी अपेक्षा थोडी कमी करून विवाहास सामोरे जावे. आपल्या आई-वडिलांचे मतही विचारात घ्यावे. असे आपले मत मांडले.व उदघाटन समारंभाच्या वेळी वधुवर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, वधुवर सुचक केंद्राचे अध्यक्ष सूर्यकांत बे
मेढेकर ,किरण किरवे, मधुकर गुरुवाडे, दिलीप शिंदे प्रकाश देशमाने, चंद्रकांत जगनाडे, शंकर पवार, रवींद्र उबाळे, दिलीप कटके, राजेंद्र किरवे, विनोद क्षीरसागर ,रामचंद्र वाचकवडे, शैलेश झगडे, दत्तात्रेय ढोले, विठ्ठलराव किरवे ,भगवान खंदारे, संतोष किरवे ,अशोक तांबे इत्यादी कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले. सदर केंद्र प्रत्येक रविवारी संध्याकाळी चार ते सात या वेळेस समाज बांधवांसाठी चालू ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भोज व दिलीप शिंदे यांनी केले तर, प्रास्ताविक रत्नाकर दळवी यांनी केले. व आभार प्राध्यापक शंकर पवार सर यांनी मांडले. अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.