पुणे,दि.०७ :- पुणे शहरांतील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे.व कारवाई करुन 22 जणांना ताब्यात घेऊन 1 लाख 22 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सामाजिक सुरक्षा विभागाला गुरवार (दि.5) घोरपडी गाव, वानवडी परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटका जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली. व सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने पाळत ठेवून जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी 22 जणांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले. या कारवाई पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल, मटका जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 22 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र जुगार अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर पुढील कारवाई करीता वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त, संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, इरफान पठाण, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने केली आहे.