पुणे,दि.०३:- पुणे शहरात जी- 20 परिषदेच्या अनुषंगाने ड्रोन कॅमेरा चा छायाचित्रण करीता वापर करण्याबाबत पुणे शहर पोलिसांनी मनाई केली आहे. पुणे शहर विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त, आर राजा यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात खबरदारीचा उपाय म्हणून 10 जानेवारी 2023 ते 20 जानेवारी 2023 पर्यंत जी- 20 परिषदेच्या अनुषंगाने ड्रोन कॅमेरा द्वारे छायाचित्रणा करिता वापर करण्यास मनाई आदेश दिला आहे.पुणे शहरात 1 डिसेंबर 2022 ते 30 डिसेंबर 2023 दरम्यान होणाऱ्या जी – 20 परिषदेचे भारतामध्ये आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी 29 देशातील प्रतिनिधी आणि 15 आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी असे जवळपास 200 मान्यवर या परिषदेमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 16 ते 17 जानेवारी 2020 या कालावधीत पुणे शहर येथे ही परिषद होणार आहे. या परिषदेतील मान्यवर पुण्यातील महत्त्वाच्या पुण्यातील सेनापती बापट रोड येथे जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल येथे राहणार आहेत व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व इतर स्थळांना भेटी देणार आहे.
या परिषदेतील 29 देशातील प्रतिनिधी आणि 15 आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी असे जवळपास 200 मान्यवर यांच्या जीवितास कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये व ते राहत असलेले मुक्कामाचे ठिकाणी व भेटी देणाऱ्या इतर महत्त्वाच्या स्थळांच्या भागात त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अशा ठिकाणी काही असामाजिक तत्त्वाकडून तसेच अन्य व्यक्तींकडून ड्रोनचा वापर करून घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.
याकरिता जेडब्ल्यू मेरीट हॉटेल, सेनापती बापट रोड, पुणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व इतर स्थळांच्या भोवताली सुमारे दोन किलोमीटरच्या परिघातील परिसरात 10 जानेवारी 2023 रोजी पासून पुढे 20 जानेवारी 2020 रोजी पर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रणाकरिता वापर करणारे ड्रोन चालक/ मालक, संस्था/आयोजक व नागरिक यांना ड्रोन न वापरण्याबाबत सत्तेता पटवून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे आर राजा पोलीस उप आयुक्त विशेष शाखा पुणे शहर यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात खबरदारीचे उपाय म्हणून 10 जानेवारी 2023 ते 20 जानेवारी 2023 रोजी पर्यंत जी 20 परिषदेच्या अनुषंगाने ड्रोन कॅमेरा द्वारे छायाचित्रणा करिता वापर करण्यास मनाई आदेश दिला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 860 च्या कलम 188 अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहिल.