पिंपरी चिंचवड,दि.१६ :- पॅथालॉजी क्षेत्रात मागील पंधरा वर्षांपासून मुंबई आणि पुण्यात कार्यरत असणाऱ्या “उबरकेअर” डायग्नोस्टिकची सेंटरची नवीन शाखा १५ ऑगस्ट पासून वाकड येथे सुरू झाली आहे. येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान सिटिस्कॅन, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी या सुविधा मोफत देण्यात येणार असून, एमआरआय, टूडी इको आणि इतर तपासण्यांमध्ये ५० टक्के सूट देण्यात येणार असल्याची घोषणा उबरकेअरचे अध्यक्ष डॉ. अकिल खान यांनी सोमवारी (दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी) केली.
उबरकेअरच्या वाकड, कस्पटे वस्ती येथील सोनिगरा लॅंडमार्क येथे रेडिओलॉजी इमेजिंग अँड डायगनॉस्टिक सेंटरचे उद्घाटन सोमवारी (दि. १५ ऑगस्ट २०२२) सफिया खान यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. अकील खान, अमिना सैय्यद आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. अकिल खान यांनी सांगितले की, “सबसे सस्ता, सबसे अच्छा” हे उबरकेअरचे ब्रीदवाक्य आहे. उबरकेअर ही आंतर राष्ट्रीय दर्जाची पंचतारांकित आरोग्य तपासणी सुविधा देणारी नामांकित संस्था आहे. मुंबई पाठोपाठ आता पुणे शहरात उबरकेअरचा विस्तार होत आहे. यापूर्वी औंध येथे शाखा सुरू करण्यात आली आहे. पुण्यातली ही दुसरी शाखा स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने वाकड येथे कार्यान्वित झाली आहे. या ठिकाणी सर्व अत्याधिक सुविधा पुरविण्यात येणार असून, त्यासाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित यंत्रसामुग्री बसविण्यात आली आहे.
वाकड परिसरातील नागरिकांना वैद्यकीय तपासण्याची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान सिटिस्कॅन, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी या सुविधा मोफत देण्यात येणार आहे. तर एमआरआय, टूडी इको आणि इतर तपासण्यांमध्ये ५० टक्के सूट देण्यात येत आहे. त्याचा लाभ अधिकाधिक गरजू रुग्णांनी घ्यावा असेही आवाहन डॉ. अकिल खान यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ९१६८६६८३८३, ९१६८६६८५८५, किंव्हा ०२०२९५१७५१७/१८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता – उबरकेअर, सोनिगरा लॅंडमार्क, तळमजला, छत्रपती चौक, कस्पटे वस्ती, वाकड.