पुणे,दि.३१:-सेवानिवृत्तीच्या दिवशी पुणे शहर पोलिस दलातील 19 जणांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देत त्यांना गौरविण्यात आले. आयुष्यभर पोलीस दलात काम केल्याचे समाधान कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटूंबियांच्या चेहऱ्यावर दिसून आले.वयोमानानुसार दलातील 81 अधिकाऱ्यांसह कर्मचारी 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. यावेळी पुणे शिवाजी नगर येथील मुख्यालयातील मैदानावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते सेवानिवृतांचा सन्मान करण्यात आला.
पोलीस आयुक्तालयातंर्गत विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 19 सहायक पोलीस फौजदारांना सेवानिवृत्तीच्या दिवशी पोलीस उपनिरीक्षपदी पदोन्नती देण्यात आली. त्याशिवाय 62 अमलदारांना प्रशिस्तीपत्रक देत गौरविण्यात आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत गौरवउद्गार काढले. यावेळी
सेरोमोनियल परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांनी मानवंदना दिली. कार्यक्रमाला सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, अपर आयुक्त नामदेव चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.