पुणे,दि.१३:- पुणे रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आणि जिलेटीनच्या कांडया आढळून आल्या असल्याची माहिती आज सकाळी ११वाजता समोर आली होती पण त्यात कोणतेही स्फोटक नसून फटाक्यासारखे क्रॉकर असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.त्यामुळे पोलिसांची तत्परता तपासण्यासाठी डेमो आयोजित करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक असून सर्व नागरिकांना परिसरापासून लांब पाठवण्यात आलं होते. या ठिकाणी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, डॉग स्कॉड सुद्धा दाखल झाले.होते
पुणे रेल्वे स्थानकात खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आलं होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा रेल्वे स्थानकात दाखल झाले होते. संपूर्ण परिसरात बीडीडीएस पथकाकडून तपास सुरू करण्यात आले. रेल्वे स्थानकातून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं होते आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वर वाहतूक थांबवण्यात आली होती
स्फोटके नसून फटाक्यासारख्या वस्तू असल्याचा रेल्वे पोलिसांचा दावा
पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने आज सकाळी एकच खळबळ उडाली असून त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण रेल्वे स्थानकाचा परिसर रिकामा करण्यात आला.होता सुमारे ११ वाजल्यापासून हा सर्व प्रकार सुरु होता सव्वा बारा वाजता बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली आहे. त्यात कोणतेही स्फोटक नसून फटाक्यासारखे क्रॉकर असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांची तत्परता तपासण्यासाठी डेमो आयोजित करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
याबाबत रेल्वे पोलिसांनी सांगितले की, रेल्वे स्थानक परिसरातील दर्गासमोरुन आरक्षण केंद्राकडे जाणार्या गेटजवळ संशयास्पद वस्तू असल्याचा फोन रेल्वे पोलिसांना आला. त्यांनी तातडीने ही बाब सर्वांना कळविली. शहर पोलीस दलाचे अधिकारी, बॉम्बशोधक व नाशक पथक तातडीने तेथे दाखल झाले.
त्यांनी संपूर्ण परिसर रिकामा केला. बॉम्बशोधक व नाशक पथकाने त्याची पाहणी केल्यावर त्यात कोणतेही स्फोटक नसल्याची खात्री झाली.
त्यानंतर त्यांनी ही वस्तू ताब्यात घेतली आहे.
याबाबत रेल्वे पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले की, पुणे रेल्वे स्थानकावर फटाक्यातील क्रॉकरसारखी संशयास्पद वस्तू आढळून आली असून त्या जिलेटिनच्या कांड्या नाहीत. त्याची तपासणी सुरु आहे. पोलीस किती अलर्ट आहेत, हे तपासण्यासाठी बहुदा हा डेमो घेतला असल्याची शक्यता आहे.