मुंबई,दि.२६ :- महाराष्ट्रातील नागरिकांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे, राज्य सरकारने सीएनजी गॅसवरील कर(व्हॅट) कमी केल्याने महाराष्ट्रात एप्रिल महिन्यापासून सीएनजी गॅस स्वस्त मिळणार आहे.
“अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्याने सध्या अनेक नागरीक गाडीत सीएनजी गॅस वापरत आहे, सीएनजी गॅसची किंमत सध्या ६६ रुपये इतकी आहे, या निर्णयामुळे एप्रिलपासून ही किंमत आणखी कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.