पुणे,दि.१६ :- कोरोनाचे संकट आता कमी झाले असून बऱ्यापैकी सगळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. असं असलं तरी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेले नियम पाळणं गरजेचंच आहे.मास्कचा वापर, देहदूरी आणि हात धुणे या कृती सतत करणे गरजेचं आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे सण-उत्सव साजरे करण्याला तशी अडचण उरली नाहीये. त्यामुळे नेहमीच्याच उत्साहाने मात्र आवश्यक ती खबरदारी घेत समारंभांना सरकारने परवानगी दिली आहे. येत्या १७ तारखेला होळीचा सण महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. मात्र, या होळी आणि धुळवड सणाच्या निमित्ताने गृहखात्याने नवी नियमावली जारी केली आहे
पोलिसांनी जारी केलेली नियमावली पुढीलप्रमाणे –
रात्री दहाच्या आत होळी करावी
दहाच्या आत होळी करमे बंधनकारक असून त्यानंतर परवानगी नाही.
होळी साजरी करताना डीजे-डॉल्बी लावण्यास बंदी
डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल
होळी साजरी करताना मद्यपान आणि बिभत्स वर्तन केल्यास कारवाई
महिलांची आणि मुलींची खबरदारी घेणे आवश्यक
दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नयेत
कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये
धूलवडीच्या दिवशी जबरदस्ती रंग आणि पाण्याचे फुगे फेकू नये