पुणे,दि.०६ :- पुणे मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदी यांनी मेट्रोला हिरवी झेंडा दाखवला.त्यानंतर मोदी यांनी तिकीट काढेल आणि मेट्रोमध्ये बसले. यावेळी त्यांच्यासोबत
अंध विद्यार्थी सोबत होते. मेट्रो प्रवास सुरु झाला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या मुलांसोबत संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्याआधी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मोदी यांचा सत्कार केला. तसेच शाही फेटा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सुबक मूर्ती देऊन सत्कार केला.