पुणे,दि.१३ :- कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत काही दिवसांपूर्वी काही पुणे शहर पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले होते व पुणे शहर खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या नाईक प्रदीप तानाजी न्यायनीत तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.त्यांच्या निलंबनाचे आदेश परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी काढले आहेत.प्रदीप न्यायनीत यांच्याकडे तपासासाठी असलेल्या गुन्ह्यांचा तपास मुदतीत केला नाही. तसेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन आरोपींना योग्य ती शिक्षा होणे आवश्यक असताना न्यायनीत यांनी पोलीस दलाच्या शिस्तीचे उल्लंघन केल्याचे आदेशात नमूद केले आहे. तसेच वरिष्ठांनी वारंवार खुलासा मागवल्या नंतरही खुलासा सादर केलेला नाही. यामुळे प्रदीप न्यायनीत यांनी कर्तव्यपालन करत असताना तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. त्यांचे हे वर्तन नियमातील तरतुदींचा भंग करणारे असल्याचे आदेशात नमूद केले आहे. प्रदीप न्यायनीत यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील नियमांचे उल्लंघन केले आहे.
त्यामुळे पुणे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे.
निलंबन कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही.
तसेच मुख्यालय सोडता येणार नाही.मुख्यालय सोडायचे असेल तर पोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे यांना अगोदर माहिती देऊन त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.निलंबन कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.