लातूर,दि.०५ :- लातूर जिल्हातील पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांना जाहिरातीच्या नावाखाली 25 हजारांची मागणी करुन 10 हजार रुपये स्वीकारल्यानंतर एका वृत्त पेपरच्या पत्रकार अटक करण्यात आली आहे.जावेद शेख असे आरोपीचे नाव आहे.बातमी मागची बातमी’ या वृत्त पेपरचा पत्रकार जावेद शेख यांनी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना ते संपादक असलेल्या पेपर साठी जाहिरातीच्या किमतीचे दर पत्रक व्हॉट्सअपवर पाठवले. तसेच फोन करून पोलिस अधीक्षकांच्या व पोलीस खात्याचे विरोधात बदनामकारक बातम्या न छापण्यासाठी जाहिरातीच्या नावाखाली 25 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती दहा हजार रुपये स्वतः स्वीकारले. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे शिवाजी नगर येथे कलम 384, 385 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वृत्त पेपरचा पत्रकार जावेद शेख याला ताब्यात घेतले आहे. जावेद शेख यांच्याकडून काही वस्तूही जप्त करण्यात आल्या असून यातून काही संशयास्पद घडामोडींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील हे करीत आहेत.