पुणे ग्रामीण, दि.२६ :- .डॉ.अभिनव देशमुख , पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, यांचे संकल्पनेतुन कोरोना. ओमीकॉन महामारीच्या काळात नागरीकांना रक्ताची कमतरता भासु नये , तसेच कोरोना / ओमीकॉन महामारीच्या काळात संसर्ग वाढु नये या दृष्टीकोनातुन २६ जानेवारी २०२२ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करणेबाबत सुचीत करण्यात आलेले होते . त्या अनुषंगाने आज दिनांक २६/०१/२०२२ रोजी मितेश घट्टे , अपर पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण, मंदार जवळे , उपविभागीय पोलीस अधिक्षक , जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी प्रमोद क्षीरसागर , आळेफाटा पोलीस स्टेशन आयोजित भव्य महारक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते .३३६ युनिट रक्त जमा सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज दिनांक २६/०१/२०२२ रोजी सकाळी १०:०० वा प्रभारी अधिकारी प्रमोद क्षीरसागर , आळेफाटा पोलीस स्टेशन यांनी रक्तदान करून सुरूवात केली . त्यानंतर प्रभारी अधिकारी श्री प्रमोद क्षीरसागर यांचे आवाहन नुसार आळेफाटा व परिसरातील विविध सामाजिक संघटना , बचत गट महिला मंडळ , कॉलेजचे युवा – युवती तसेच आळेफाटा पोलीस स्टेशनचे एकुण ३० अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदान केले आहे . सदरचे रक्तदान शिबीर रोटरी क्लब , व्यापारी असोसिऐशन , पत्रकार संघ आळेफाटा यांच्या सहकार्याने महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते .