पुणे, दि.०९ :- लोणावळ्या सह इतर जिल्ह्यात येत्या चार-पाच दिवसांत पावसासोबत गारपीटीची शक्यता हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या इतर भागात वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकर्यांवर संकट ओढवण्याची शक्यता आहे. मागील वर्षी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान कंबरडे मोडले
आहे.शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक टंचाईच्या खाईत लोटले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलादेखील तसंच काहीसं चित्र बघायला मिळतं. शेतकरी यातून सावरत नाही तोच पुन्हा त्याच संकटाचे संकेत नवीन वर्षाच्या रब्बी हंगामातही गोंगगावात असल्याचे चित्र बघायला मिळते.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे. काही शहरा सोबत, तालुक्याच्या काही भागात काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसला आहे. तर जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण आहे. आज सकाळीही सूर्यदर्शन झाले नाही. पडत असलेला अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांची धडकी भरवणारा आहे.