पुणे ग्रामीण, दि.०७ :- सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे निवृत्ती बाबाजी नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स लोणावळा व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर विभागीय क्रिकेट मुले व मुली स्पर्धा दि. 1 ते 6 जानेवारी या कालावधीत संपन्न झाले. 1 जाने., रोजी मुलांच्या आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन लोणावळा संकुलाचे संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, सिंहगड आर. एम. डी. वारजेचे संचालक डॉ. वैभव दिक्षित व प्राचार्य डॉ. मगन घाटुळे यांच्या हस्ते करण्यात आले मुलींच्या आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत देसाई व प्राचार्य डॉ. एम. एस. रोहोकले यांच्या हस्ते करण्यात आले. आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर व नाशिक अशा चार मुले व मुलींच्या संघाने सहभाग नोंदविला.दि. 01 ते 03 जाने., 2022 दरम्यान झालेल्या मुलांच्या सामन्यांमध्ये अहमदनगर विभाग प्रथम, पुणे ग्रामीण द्वितीय व पुणे शहरने तृतीय क्रमांक पटकाविला.लीग पद्धतीने झालेल्या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये मुलांच्या संघामधून मानव काटे (अहमदनगर) 237 रन, शिवराज शिंदे (पुणे ग्रामीण) 156 रन व रौनक ढोले पाटील (पुणे ग्रामीण) 08 विकेट बिरदवडे सागर (पुणे शहर) 7 विकेट घेतल्या.दि. 04 ते 06 जाने., 2022 दरम्यान झालेल्या मुलींच्या सामन्यांमध्ये नाशिक विभाग प्रथम, पुणे शहर द्वितीय व अहमदनगर संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.मुलींच्या संघामधून चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये ईश्वरी सावकार (नाशिक) 276 रन, साक्षी कानडी (नाशिक) 147 रन, सायली लोणकर (पुणे शहर) 139 धावा केल्या.प्रियंका घोडके (नाशिक) 08 विकेट, ईश्वरी सावकार (नाशिक) 06 विकेट, प्रज्ञा वीरकर (पुणे शहर) 05 विकेट घेतल्या. स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन महाविद्यालयाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अनिल कमलापुरे यांनी केले. सातत्याने चौथ्या वर्षी या क्रीडा स्पर्धांचे संयोजन करण्याची संधी सिंहगड संकुलाला मिळाली……………….