श्रीगोंदा,दि.२९ :- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी कारखान्यात भ्रष्टाचार केल्याने पुन्हा सत्ता आल्यास कारखाना बंद पडून सहकार मोडीत निघण्याची भीती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी टाकळी भागात कार्यकर्ते भेटी दरम्यान पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली
शेलार म्हणाले कोविड काळात सर्वत्र दळणवळण बंद असताना नागवडे यांनी डिझेलवर १७ लाख तर गेस्ट हाऊस वर ८ लाख रुपये खर्च दाखविला आम्ही संचालक या नात्याने विचारणा करता उत्तर देण्याचे टाळले शिवाय आमच्या एकाही आरोपांना उत्तरे दिली नाहीत. त्याऐवजी आम्हा विरोधकांच्या आरोपांची खिल्ली उडवली. परंतु आम्ही जागृती करत आहोत राजेंद्र नागवडे यांचा सहकार टिकविण्या ऐवजी खाजगी कारखान्याकडे जास्त ओढा आहे.ही सभासदांच्या हिताच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. म्हणून माजी व्हाईस चेअरमन केशव भाऊ मगर यांनी कारखाना सहकारी रहावा.यासाठी सहकार विकास पॅनल उभा केला,असून कोणाच्या राजकीय अस्तित्वा साठी नाही तर सभासदांच्या मालकीचा कारखाना अस्तित्वात रहावा यासाठी सहकार विकास पॅनल विजयी करण्याचे आवाहन शेलार यांनी केले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे