पुणे,दि०६:- – पुणे जिल्ह्यात ओमायक्रॉन विषाणू काही पेशंट आढळले आहे. पिंपरीमध्ये सहा तर पुणे शहरात एकाला ‘ओमायक्रॉन’ विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून, राज्यात आता बाधित संख्या आठ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांकडून अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. ‘कोरोनानंतर आता ओमायक्रोन बाधित काही रुग्ण आढळून आले आहे. याविषयी नागरिकांनी घाबरून जावू नये. नागरिकांनी आरोग्य विभागाने जारी केलेल्या नियमांचे स्वयंस्फूर्तीने पालन करणे गरजेचे आहे. विशेषतः मास्कचा वापर, सोशल डिस्टन्ससह इतर नियम कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. राज्य सरकारच्या आदेश प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडून पुढील निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. पुणे शहराच्या सुरक्षिततेकरिता प्रामुख्याने सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. या काळात प्रसार माध्यमांत येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. कृपया कुणीही अफवा पसरवू नयेत तसेच अनधिकृत माहिती अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये..’ अशी माहिती सह पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी दिली आहे.