पुणे,दि.१८: – पुणे शहरातील पाषाण परिसरातील श्री. सोमेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त त्रिपुरारी पौर्णिमा सोमेश्वर अन्नकोट व दीपोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भगवान श्री. सोमेश्वरांना ५६ भोग अर्पण करण्यात आले, विविधरंगी फुलांची सजावट, रांगोळी व गालिचा आणि आकर्षक रंगातील पणत्यांसह दिव्यांची आरास अशा मंगलमय व प्रसन्न
वातावरणात (दि.18 नोव्हें.) उजळून निघाले आहे.त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्यांच्या प्रकाशाने तेजोमय झालेले मंदिर पाहण्यासोबत आपल्या लाडक्या दैवताचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो पणत्या, सुरेख नक्षीदार रांगोळी आणि मंदिरातील
भारलेले पवित्र वातावरण पुणेकरांना यानिमित्ताने अनुभवायला मिळाले.
हे मनोहारी दृश्य टिपण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली मात्र आम्ही आमच्या वाचकांना फोटोच्या माध्यमातून या सुंदर, नयनरम्य
मंदिरांची सफर घडवणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री. सोमेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता फुलांची सजावट, रांगोळी व गालिचा आणि आकर्षक रंगातील पणत्यांसह दिव्यांची आरास असे डोळे दिपून टाकणारे दृष्य श्री. सोमेश्वर मंदिर येथे पाहायला मिळाले व मंदिर सजावटीत पर्यावरणापूरक गोष्टींचा प्रामुख्याने वापर करण्यात आला.
सर्व फोटो : मंदार दीक्षित