नवी दिल्ली,दि.०१ :- आत्मनिर्भर भारतासाठी ‘मेक इन इंडिया’ व्हिजनचा आरंभ करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी प्रामा या भारतातील आघाडीच्या एतद्देशीय व्हिडियो सिक्युरिटी ब्रँडवरील स्मरणपुस्तक नवी दिल्ली येथे प्रकाशित केले. प्रामाच्या प्रेरणादायक प्रवासाचा आणि स्वावलंबी भारताच्या पंतप्रधानांच्या व्हिजनला चालना देणाऱ्या स्थानिक निर्मितीसाठीच्या आग्रहाचा प्रवास या पुस्तकात शब्दांकित करण्यात आला आहे. प्रामा ही भारतातील सर्वात मोठी आणि पहिलीवहिली कंपनी आहे जी आत्मनिर्भर भारताच्या ब्रीदवाक्याचे प्रतिनिधीत्व करते. वाहतूक सुरक्षा, वाहतूक व स्मार्ट वाहतूक सोल्यूशन्सच्या क्षेत्रामध्ये वाहतूक क्षेत्रासाठी असलेले नवीनतम तंत्रज्ञान, उत्पादने आणि सोल्यूशन्सचे प्रदर्शन करण्यासाठी प्रामा इंडियाने ट्राफिकइन्फ्रा एक्स्पो 2021 च्या 9 व्या पर्वामध्ये सहभाग घेतला.वाहतूक सेगमेंटससह विविध क्षेत्रांसाठी प्रामा इंडियातर्फे स्थानिक पातळीवर उत्पादन केलेल्या अभिनव उपाययोजना प्रदान करण्यात येतात. रोजगारसंधींची निर्मिती करून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देतानाच भारतीयत्वाचा अभिमान मिरवणारी उत्पादने विकसित करण्यावर या ब्रँडतर्फे लक्ष केंद्रीत करण्यात येते.कंपनीने असा उत्पादन पोर्टफोलियो तयार करण्यासाठी प्रचंड गुंतवणूक केली आहे ज्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अभिनवता व भारतातील उत्तम इनोव्हेशन व दर्जा यांची सांगड घातली आहे, ज्याने सुरक्षा व संनिरीक्षण उत्पादनांमध्ये जागतिक नकाशावर भारताला स्थान प्राप्त करून दिले आहे. जगासाठी भारताचा आघाडीचा एतद्देशीय सुरक्षा ब्रँड होण्याच्या प्रामाचा प्रवास शब्दांकित करण्यात आलेल्या खास कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केल्याबद्दल सन्माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रामा इंडिया आभारी आहे.भारतातील विस्तृत वाहतूक क्षेत्रामध्ये नवनवीन स्मार्ट वाहतूक ट्रेंड्स व अभिनव सुरक्षा सोल्यूशन्ससह वेगाने बदल घडत आहे. नवीन तंत्रज्ञान, उत्पादने आणि वाहतूक परिसंस्थेतील महत्त्वाच्या भागधारकांसाठीची उत्पादने व सोल्यूशन्सचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी ट्राफिकइन्फ्राटेक एक्स्पो हा उत्तम प्लॅटफॉर्म राहिला आहे.या एक्स्पोमध्ये प्रामाने महामार्ग, मेट्रो, विमानतळ आणि बंदरासाठी आधुनिक वाहतूक उपाययोजना प्रदर्शित केल्या होत्या. त्याचप्रमाणे लायसन्स प्लेट रेकग्निशन, सार्वजनिक सुरक्षा, कायदा अंमलबजावणी आणि इन व्हेइकल मॉनिटरिंग यंत्रणांसाठी उपाययोजना प्रदर्शित केल्या.व्हिडियो सुरक्षा उत्पादनांमध्ये भारताला जागतिक नकाशावर स्थान प्राप्त करून देण्याच्या विश्वासाने स्थापन करण्यात आलेली प्रामा ही भारतातील सर्वात मोठी आणि भारतातील पहिल्या काही कंपन्यांपैकी एक कंपनी आहे ज्यांनी आत्मनिर्भर भारत हे ब्रीद आचरणात आणले. प्रामा हा एतद्देशीय ब्रँड ‘भारतासाठी, भारताने भारतात तयार केलेले’ हे बोधवचन अवलंबतो आणि सर्व सुरक्षा गरजांची पूर्तता करणारी उच्च दर्जाच्या सुरक्षा उत्पादनांचे उत्पादन करते.भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ पुढाकाराने प्रोत्साहित होऊन प्रामा इंडियाने भारत हा व्हिडियो सुरक्षा उत्पादनांसाठी जागतिक पातळीवरील उत्पादन व निर्यात केंद्र व्हावा यासाठी भारतातील पहिला जागतिक दर्जाचा कारखाना उभारला. व्हिडियो सुरक्षा उत्पादनांच्या एतद्देशीय उत्पादनांच्या माध्यमातून भारताचे सबलीकरण करण्याचा कंपनीचा निर्धार आहे. हार्डवेअर व सॉफ्टवेअर सोल्यूशन्समध्ये नावीन्यपूर्णता आणण्यासाठी व अपडेट करण्यासाठी सतत बदलणारे तंत्रज्ञान आणि प्रगती लक्षात घेत त्यांचे संशोधन व विकास केंद्र विकसित करण्यात आले आहे.