पुणे, दि११:-सेनापती बापट रोडकडे भरधाव वेगाने जाताना बीएमडब्ल्यु कारने रस्ता ओलांडणार्या पादचारी मंडल अधिकारी महिलेला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यु झाला.सेनापती बापट रोडवरील पॅव्हेलियन मॉलसमोर गुरुवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता हा अपघात घडला.याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी कारचालक अक्षय महादेव एकडे (वय २५, रा. श्रेयश अपार्टमेंट, ई स्क्वेअरसमोर, मॉडेल कॉलनी) याला अटक केली आहे. रिना सिताराम मुंढे ऊर्फ रिना सचिन मडके (वय ३२, रा. वारजे माळावाडी) असे मृत्युमुखी पावलेल्या महिलेचे नाव आहे.याप्रकरणी सचिन नारायण मडके (वय ३५, रा. वारजे माळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.त्यांची पत्नी रिना या सेनापती बापट रोडवरील झोपडपट्टी पूनर्वसन प्राधिकरणात मंडल अधिकारी म्हणून काम करीत होत्या.गुरुवारी सायंकाळी कार्यालयातील काम संपल्यावर त्या घरी जाण्यासाठी पायी निघाल्या होत्या.सेनापती बापट रोडवरील पॅव्हेलियन मॉलसमोर रस्ता ओलांडून पलिकडे जाण्यासाठी पादचार्यांना मार्ग जात आसताना.रिना मडके या तेथून रस्ता ओलांडत असताना अक्षय एकडे हा त्याची बीएमडब्ल्यु कार घेऊन विद्यापीठ कॉर्नरवरुन वेताळबाबा चौकाच्या दिशेने वेगाने जात होता.त्याने रस्ता ओलांडणार्या रिना यांना जोरात धडक दिली.त्यात रिना या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.