‘बहुजन मुक्ती पार्टी’ च्या पाठीमागे अदृश्य शक्तीचा हात – प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ
वारंवार होणारे लॉकडाऊनमुळे देशात आर्थिक आणीबाणी निर्माण होणार – प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ
अहमदनगर जिल्ह्याचे बहुजन मुक्ती पार्टी चे भव्य कार्यकर्ता संमेलन व जाहीर कार्यकर्ता प्रवेश श्रीगोंदा मधील तुळशीदास मंगल कार्यालय मध्ये पार पडला. यावेळी बोलताना ‘बहुजन मुक्ती पार्टी’ चे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी महाविकास आघाडी व विरोधी पक्षावर हल्लाबोल केला. सत्ताधारी व विरोधकांचे छुपी युती आहे. दोघेही जनतेला मूर्ख बनवत आहेत. जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. प्रस्थापित पक्षांचे विविध ‘सेल’ हे समाज खरेदी-विक्रीचे दलाल आहेत. अशांपासुन समाजाने सावध राहिले पाहिजे. बहुजन मुक्ती पाठीमागे अदृश्य शक्तीचा हात असल्यामुळे कोणतेही कार्य आम्हाला अशक्य नाही.
तीन वेळा पत्र लिहूनही मोदी संभाजीराजेंना भेट देत नाही तसेच ओबीसींची जातिनिहाय जनगणना करत नाही हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे, या अपमानाचा बदला बहुजन मुक्ती पार्टी घेतल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळात मराठा-ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यासाठी महाराष्ट्रभर जनआंदोलन निर्माण करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे.
बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब मिसाळ पाटील यांनी कार्यकर्त्यांनी लोकजागृती करण्यासाठी सर्व जाती-धर्मांमध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी राजेंद्र करंदीकर पारनेर, गोरख फुलारी पुणे, युवा नेते नितीन शिंदे, साहेबराव सावंत, आदींनी मनोगत व्यक्त केले.
अहमदनगर दक्षिण चे जिल्हाध्यक्ष समीर शिंदे पाटील , श्रीगोंदा तालुका अध्यक्ष सुरेश रणनवरे, शहराध्यक्ष सुभाष बोराडे , युवा अध्यक्ष संजय कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या प्रसंगी मनोहर पवळ, नाथा सावंत, तानाजी शिंदे, मोहन सावंत, हृषिकेश सावंत,आकाश जगताप, नाना चव्हाण, इम्रान हकीम, सुदाम सावंत,प्रतिक घोडके, रूपचंद सावंत, रोहन मोरे, पुजा सावंत, मोनिका सोनवणे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘बहुजन मुक्ती पार्टी’ चे राज्याचे कार्यकारी अध्यक्ष संजय सावंत यांनी केले, सूत्रसंचालन अमित हरिहर, तर आभारप्रदर्शन शहानवाज इनामदार यांनी केले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे