पुणे, दि.०२ :- पुणे शहरात दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या आंतरराज्यीय टोळीला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून गुन्ह्यातील सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली अत्याधुनिक हत्यारे असा एकूण 10 लाख 9 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.साकिब शौकतअली अन्सारी (वय-23 रा. नागपूर चाळ, येरवडा, मुळ रा. मेहस्त्री, ता. कोतवाली, उत्तरप्रदेश), दानिश वारीस शेख (वय-22 रा. नागपूर चाळ, येरवडा मुळ रा. मेरठ गर्ल्स कॉलेजजवळ, ता. मेरठ, उत्तरप्रदेश), सलमान ऐहसान अलवी (वय-26 रा. येरवडा मुळ रा. कल्याणपूर, ता नगिना उत्तरप्रदेश), रिक्षाचालक वसिम शौकतअली अन्सारी (वय-24 रा. येरवडा, मुळ. रा. तेवडीमंजाळा, पोस्ट तेवडी, ता. धामपूर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. आरोपींना 24 ऑगस्ट रोजी दरोड्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने सेनापती बाबट रोडवर अटक केली होती.आरोपींची पोलीस कोठडी घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली.चौकशी दरम्यान आरोपींनी दिवसा घरफोडी केलेल्या बाणेर आणि पाषाण येथील ठिकाणे दाखवली.याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींकडून गुन्ह्यातील सोन्या-चादीचे दागिने रोख रक्कम 9 लाख 8 हजार आणि दरोड्यासाठी लागणारे 1 लाख 1 हजार 340 रुपयांचे साहित्य असा एकूण 10 लाख 9 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.सदरची कारवाई. पोलीस आयुक्त , पुणे शहर अमिताभ गुप्ता , पोलीस सह – आयुक्त रविंद्र शिसवे , पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे , सहा पोलीस आयुक्त गुन्हे -२ लक्ष्मण बोराटे , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांचे सूचनाप्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक शोभा क्षिरसागर , पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील , पोलीस अंमलदार महेंद्र पवार , राजस शेख , दिपक भुजबळ , शितल शिदे , विशाल शिर्के . दत्ता फुलसुंदर , अशोक शेलार , प्रविण भालचिम , राकेश खुणये , कौस्तुभ जाधव , प्रविण कराळे . सुरेन्द्र साबळे , स्वप्निल कांबळे , संजय आढारी , रमेश राठोड , सागर वाघमारे यांनी केली आहे . आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक शोमा क्षिरसागर व पोलीस उप – निरीक्षक जयदिप पाटील हे करित आहेत .