पुणे ग्रामीण,दि.१७ ;- जिल्हा परिषदत अंतर्गत असलेल्या एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्पामध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असणार्या महिलेस 3 हजार 450 रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. महिला लिपिकास अटक करण्यात आली आहे. सीमा विद्याधर विपट (47, कनिष्ठ लिपिक, एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प (जिल्हा परिषद अंतर्गत), ता. मुळशी पौड, जि.पुणे) असे लाच घेणार्या महिलेचे नाव आहे. त्याच्याबाबत एका 26 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आज सापळा रचण्यात आला. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव अप्पर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक श्रीहरी पाटील त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली आहे. पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सुनिल क्षीरसागर , पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. पुणे युनिट हे करत आहेत .
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक. राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व अपर पोलीस अधीक्षक. सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे , सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयासदुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३, ३. व्हॉट्सअॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३, ४. क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .