पुणे, दि.१४:-पुणे परिसरातील पौड रस्त्यावर एका तरूणाच्या खुनप्रकरणी बाबा बोडके याच्यासह तिघांची उच्च न्यायालयाने दि. 13 ऑगस्ट 2021 निर्दोष मुक्तता केली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) लागू होऊ शकत नाही असा निर्वाळा देखील न्यायालयाकडून करण्यात आला आहे.कमलाकर उर्फ बाबा किसन बोडके (रा. साप्रस, आळंदी रस्ता), एकनाथ उर्फ पप्पू मच्छिंद्र गायकवाड (रा. ताडीवाला रस्ता) आणि सोमनाथ उर्फ आप्पा भगवान शिंदे (रा.गवळी आळी, मुंढवा) अशी मोक्कातून मुक्त केलेल्यांची नावे आहेत. बाबा बोडकेसह इतरांविरूध्द पौड रस्त्यावर 9 मार्च 2003 मध्ये झालेल्या श्याम शिंदेच्या खूनाचा आरोप होता. बाबा बोडके आणि इतरांची गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्याने त्यांच्याविरूध्द पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.पोलिसांकडून लावण्यात आल्यानंतर त्यांनी मोक्का कारवाईला
उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सरकार पक्ष आणि आरोपींच्या वकिलांना जोरदार युक्तीवाद झाला.न्यायाधीश साधना जाधव आणि न्यायाधीश एन.आर. बोरकर या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.सदरील निकालपत्र हे शुक्रवारी (दि. 13 ऑगस्ट 2021) जारी करण्यात आले आहेत.दरम्यान, ज्यावेळी पुणे शहर पोलिसांकडून बाबा बोडके आणि इतरांविरूध्द मोक्काची कारवाई करण्यात आली होती