पुणे, दि..१०:- रानभाजीचे आरोग्य विषयक महत्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना होण्यासाठी व विक्री व्यवस्था करुन त्याचे विक्रीतुन शेतक-यांनाही आर्थिक फायदा होण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत “रानभाज्या महोत्सव” खेड, आंबेगाव व जुन्नर या तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
रानभाज्या महोत्सवाच्या कार्यक्रमात रानभाज्यांचे प्रदर्शन, विक्री, आहारातील महत्व, लागवड पध्दती व संवर्धन यानुषंगाने उत्पादक शेतकरी व ग्राहकांना माहिती होणेसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पत्रकान्वये दिली आहे