पुणे दि २०:- नागरिकांच्या मनातील सुप्त इच्छा पुर्ण होण्यासाठी अनेकजण कोणत्याही थराला जाउ शकतात. त्यासाठी विशेषतः मांत्रिक, भानामती, जादूटोणाद्वारे भोंदूगिरीला खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे राज्यात अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा होउनही दिवसेंदिवस भोंदूगिरीचा भुलभुलैय्या वाढत चालला असल्याचे घटनांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये अशिक्षितापासून ते सुरक्षितापर्यंत मोहजाळ्यात गुरफटल्याचे दिसून आले आहे. कधी पैशांचा पाउस तर कधी पुत्र्रप्राप्ती, भूत-प्रेत घालविण्यासाठी नागरिक भोंदू मांत्रिकाच्या नादी लागून नुकसान करून घेत आहेत. पुण्यात मागील काही दिवसांत अशाच काही घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.जादूटोणा करून व्यावसायिकाला पैशांचा पाउस पाडून दाखवितो, असे सांगत वेळोवेळी तब्बल ५२ लाखांचा गंडा घालणाNया भोंदू मांत्रिकाला पुणे पोलिसांनी नुकतेच अटक केले आहे. किसन आसाराम पवार असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्यामुळे पैशांच्या मोहापायी पुण्यातील व्यावसायिक मांत्रिकाच्या नादी लागून डुबला आहे. वंâपनीद्वारे करोडो रूपयांची उलाढाल करणाNया व्यावसायिकाला कष्टाऐवजी पैशांचा पाउस महत्वाचा वाटला. त्यामुळे मांत्रिकाने दिलेले आश्वासन पैशासह हवेतच विरले आहे. पैशांच्या पावसासाठी विविध प्रकारच्या पुजा-अर्चा करण्यासाठी रक्कम ठेवावी लागणार असल्याचे सांगत मांत्रिकाने व्यावसायिकाला जाळ्यात अडकविले होते. तब्बल ५२ लाख रुपये देउनही पैशांचा पाऊस पडला नसल्यामुळे व्यावसायिकाने पैसे देणे बंद केले. त्यानंतर आणखी पैसे लुटण्याच्या हेतूने मांत्रिकाने व्यावसायिकाला तुमचे काम झाले आहे. फक्त शेवटचा विधी करावा लागेल, असे सांगितल्यामुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून भोंदू मांत्रिकाला अटक केले.अंगात शिरलेले भूत काढून टाकण्याच्या बहाण्याने भोंदू मांत्रिकाकडून महिलांवर अत्याचार करणे, चमत्कार दाखविण्याच्या क्षमतेचा दावा करून लोकांची फसवणूकीचे अनेक प्रकार घडले आहेत. मात्र, त्यानंतरही अलौकिक शक्ती प्राप्त करण्यासाठी आयुष्य धोक्यात घालण्यास अनेकांकडून प्राधान्य दिले जात आहे. संपत्ती, पैसा मिळविण्यासाठी अमानुष कृत्यासह मानवी बलिदान देण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. मांत्रिक विंâवा एखाद्याकडे अलौकिक शक्ती आहे असे भासवून त्यांना आज्ञा पाळण्यास भाग पाडले जात आहे. दिवसेंदिवस अशा घटना वाढीस लागल्यामुळे आधुनिकतेकडे चाललेल्या समाजाची मोहमाया संपणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.