श्रीगोंदा दि १८ :-श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात दुचाकी चोरी करणा-या चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे.यातील दोन चोरट्यांकडून ८० हजाराच्या २ दुचाकी जप्त केल्या आहेत.अशी माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या वाढलेल्या घटना वाढत आहेत. काष्टी, निमगाव परिसरातून दुचाकी लंपास करणारी टोळी सक्रीय झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातून रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन चोरीचे प्रमाण वाढत जात असल्याने वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.यामुळे दुचाकी चोरांना पकडण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या.असे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सांगितले.
त्यानुसार स.पो.नि दिलीप तेजनकर यांना योग्य त्या सूचना देऊन पो.हे.कॉ.अंकुश ढवळे,पो.कॉ. प्रकाश मांडगे, पो.कॉ. किरण बोराडे, पो.कॉ. गोकुळ इंगवले,पो.कॉ. दादा टाके, पो.कॉ.अमोल कोतकर यांच्या पथकाने दुचाकी चोरणा-या टोळीतील मुख्य आरोपी अतुल उदाश्या भोसले रा. कोळगाव ता.श्रीगोंदा याला गजाआड केले.
अतुल उदाश्या भोसले याची कसुन चौकशी केली असता त्याने व त्याच्या दुसऱ्या साथीदारासोबत दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले असून साथीदाराचे नाव सांगितले. त्यात निमकर अर्जुन काळे रा.रांजणगाव मशिद ता.पारनेर यालाही ताब्यात घेतले. या दोघांकडून चोरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या. यातील सन २०२० मध्ये मुंढेकरवाडी येथील दरोड्याच्या गुन्ह्यात निमकर अर्जुन काळे हा फरार होता.
या दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी चोरलेल्या २ दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या.अतुल उदाश्या भोसले व निमकर अर्जुन काळे याचे कडे सखोल चौकशी केली असता काष्टी येथून हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल एम.एच.१६ ए.एन.५८०५ तसेच होंडा कंपनीची सी.बी.शाईन मोटार सायकल क्र.एम.एच.४२ एस.०५०१ ही त्याच्या घरासमोरुन चोरल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या या दोन चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघड होण्याचे आणि चोरीस गेलेल्या दुचाकी सापडण्याची शक्यता आहे. हे दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून यांचेवर बेलवंडी, श्रीगोंदा, सुपा पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ संभाजी शिंदे हे करीत आहेत
.श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे