पुणे दि १८ :- श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड पुणे येथे दि १७ रोजी तेली समाजाचे वधू वर पुस्तिकेचे प्रकाशन नुकतेच ‘श्री संताजी भवन, कोथरूड येथे पार पडले. घनश्याम डांगे, पोलीस निरीक्षक कोथरूड पोलीस स्टेशन ,अविनाश भट ,संपादक, प्रभात पेपर . दिलीपराव शिंदे, कार्याध्यक्ष तेली समाज पुणे .शामराव भगत, मनोहर डाके, दिलीपराव हिंदी पिक्चर ०हावळ ,पांडुरंग शिरसागर ,सिताराम तोंडे पाटील, वासुदेव गुलवाडे .यांच्या हस्ते प्रकाशन झाले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, सूर्यकांत मेढेकर, वासुदेव गुलवाडे, प्रकाश देशमाने ,किरण किरवे ,मधुकर गुलवाडे यांनी फार कष्ट घेतले. याप्रसंगी घनश्याम डांगे, शामराव भगत, दिलीपराव शिंदे, रत्नाकर दळवी, चंद्रकांत जगनाडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याच वेळेस वधू-वर पालक परिचय मेळावा 2022 च्या मेळाव्याची घोषणा करण्यात आली. पुढील वधू-वर मेळाव्यासाठी मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून सुर्यकांत मेढेकर ,खजिनदार संताजी प्रतिष्ठान कोथरूड यांची एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी संत संताजी जगनाडे महाराज ग्रंथाचे वाटप करण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार सदर कार्यक्रम पार पडला. व तेली समाज बांधव हजर होते. विठ्ठलराव किरवे, भगवान खंदारे, विजयराव भोज, गोरखशेठ किरवे, राजेंद्र किरवे, संतोष किरवे, डॉ. प्रा. शंकर पवार सर, गणेश देवराय, संजय भगत, राहुल अंबिके, रामचंद्र कटके, अशोक तांबे, अशोक साळवणे ,श्रीधर भोज, सुरेश भोज ,तुषार वाचकवडे , अनिल घाटकर,विनोद क्षिरसागर, पांडुरंग चव्हाण, रोहिदास हाडके ,हरीश देशमाने, राजेंद्र दळवी. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश भोज यांनी केले. तर आभार प्रदर्शन, डॉ. प्रा.शंकर पवार सर यांनी केले. अल्पो हाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सामाजिक, राजकीय,व पर्यटन.पुणे प्रतिनिधी :- संकेत संतोष काळे