पुणे दि ०१ :- कोरोना रुग्णांकडून काही खाजगी हॉस्पिटल मनमानी पद्धतीने आवाच्या सव्वा बिले आकारले गेले होते व त्या विरोधात भारतीय दलित कोब्रा प्रमुख अॅड.भाई विवेक चव्हाण यांनी १ मे ते ७ मे असे ७ दिवसांचे उपोषण केले होते यावेळेस काही खाजगी हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांची सर्व बिले तपासण्यात येवून घेतलेले जादा पैसे रुग्णांना परत देण्यात येतील असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले त्यानुसार सर्व जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलांनी कोरोणा पेशंटवर उपचार करताना घेतलेल्या सर्व बिलांची तपासणी करण्यात येत आहे व जादा बिलाची रक्कम परत देण्याची काम प्रत्येक जिल्ह्यात चालू झाले आहे. व पुणे जिल्ह्यात खासगी रुग्णालयांच्या बिलाची तपासणी करून ९ कोटी पेक्षा जास्त रक्कम ही काही खाजगी हॉस्पिटल कडून पेशंटला परत देण्यात आली,खाजगी हॉस्पिटल मधून ज्यादा बिल आकारण्यात आले असेल त्यांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे व महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार करावी व बिलाची रक्कम परत देण्याची मागणी करावी असे आव्हान भारतीय दलित कोब्रा तर्फे करण्यात येत आहे.