कर्जत दि २५ :- कर्जत तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न नुकताच कर्जत पोलिसांनी हाणून पाडला आहे.पुण्यात राहणारा हा इसम ज्यावर चोरी व इतर गुन्हे दाखल होते.कोवळ्या वयातील मुलींना प्रेम पाश्यात अडकवून त्यांना फूस लावून पळवून नेण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.त्याने कर्जतमधील एका सधन कुटुंबातील अल्पवयीन मुलीला ऑनलाईन चॅटिंगवर आपल्या जाळ्यात अडकवले आणि तो संबंधित मुलीस पळून न्यायला आला होता.त्यास कर्जत पोलिसांनी रात्र गस्ती दरम्यान शिताफीने पकडून हा प्रकार उघडकीस आणला. गेली पाच दिवसांपूर्वीही गुजरातमधील मुलगा जो कर्जत तालुक्यात स्वीट मार्टचे काम करत होता. सदर मुलगी ही नातेवाईकाच्या गावी गेली असता तिथे त्याची ओळख झाली होती.फोनवर संभाषण व चॅटिंग करत त्याने मुलीला फुस लावुन पळवून नेले होते या मुलीस कर्जत पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे.गेल्या महिन्यात देखील तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला ‘ऑनलाईन गेमचा’ आधार घेत एका इसमाकडून पळवून नेण्यात आले होते.तब्बल साडेसहाशे किमीचे अंतर पार करून संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळत मुलीला कर्जतच्या पोलिसांनी ताब्यात घेतले होते.अशा अनेक घटना ऑनलाईन चॅटिंगमुळे घडत आहेत.कोणतीही वैयक्तिक खरी माहिती व ओळख न देता पुरुषांकडून-मुलांकडून मुलींना ऑनलाईन चॅटिंगवर प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते यात
अल्पवयीन मुलीही मोठ्या प्रमाणावर फसल्या जातात.अशा अनेक तक्रारी व गुन्हे दाखल होत आहेत.संबंधित इसमांची खरी पार्श्वभूमी ओळखण्याची बौद्धिक क्षमता आणि ऑनलाईनच्या आभासी जगात तात्काळ गुरफटून जाण्याची वृत्ती यामुळे अशा घटनांना खतपाणी मिळत आहे.सोशल मिडियाच्या माध्यमांवर मुलांकडून व पुरुषांकडून बनावट फोटो,चुकीचा बायोडाटा अपलोड करून चॅटिंगवर आपल्या प्रेमजाळ्यात मुलींना फसवले जाते.त्यामुळे ‘ऑनलाईनचा ट्रेंड’ मुलींसाठी घातक ठरत आहे.पोलिसांच्या सतर्कतेमुळे आज कोवळी मुले चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखल्या गेली.तपासात संबंधित मुलाची चौकशी केली तर मुलगा अनेक गुन्ह्यात आरोपी किंवा अगोदरच विवाह झालेला व त्यास मुले असल्याचे निदर्शनास येते यातून मुलींचे आयुष्य बरबाद होते.त्यामुळे ऑनलाईनच्या आभासी जगापासून महिला- मुलींनी दूर राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे. वेळ निघून गेल्यावर उपयोग काय?पालकांनी आपल्या वयात येणाऱ्या मुला मुलींकडे विशेष लक्ष देणे आता जिकरीचे झाले आहे. पालकांनी आपल्या मुलांना महागडे मोबाईल देताना त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने तर होत नाही ना?याकडे सतत लक्ष देणे गरजेचे आहे.कोणत्याही मुलीसोबत अशी घटना घडली तर सर्व कुटुंब व्यथित होते.पण अशा घटना घडूच नयेत म्हणुन पालकांनीही मुलींना सावध करावे, त्यांचे समुपदेशन करावे.वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग होत नाही.कर्जत पोलिसांची ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या ठिकाणी कर्जत पोलीस मदत करण्यासाठी तयार आहेत.- चंद्रशेखर यादव
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे