श्रीगोंदा दि १६ :- श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण शिवारामध्ये श्रीगोंदा पोलिसांनी व कृषिअधिकारी यांनी बेकायदेशीर गांजाच्या शेतीवर काल दि.१५ रोजी (शनिवारी) छापा टाकला. यात एका शेतकऱ्याच्या शेतात पिकवलेला ५ लाख ४०हजार रुपयांचा गांजा जप्त केला.श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण शेतशिवारात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाल्यानंतर त्याबाबत पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांना सदरची माहीती देऊन त्याठिकाणी धाड टाकून ५ लाख ४० हजार रूपये किंमतीची ५४ किलो गांजाची ११० झाडे असा मुद्देमाल शेतातील गट नं.४५६/२ मधून जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी रामदास गेणु रायकर रा.मांडवगण,ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर असे अटक करण्यात आलेल्या गांजा लागवड करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.आरोपीने गावापासुन दुर अंतरावर माळरानाच्या शेतावर कोणाच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी गांजाच्या झाडांची चोरटी विक्री करण्याचे उददेशाने लागवड केली असल्याचे दिसुन आले. सदरचे नशाकारक पदार्थ गांजा हे केंद्रशासनाने प्रतिबंधित केले असल्याने पो.कॉ.किरण बोराडे यांचे फिर्यादी वरुन पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. २७८/२०२१ एन. डी. पी. एस. अॅक्ट १८८५ कलम २० (क) (ख) (१) प्रमाणे दाखल करण्यात आला असुन आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास स.पो.नि दिलीप तेजनकर हे करीत आहे. सदरची कारवाई ही श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के,श्रीगोंदा पोस्टेचे स.पो.नि. दिलीप तेजनकर, पो.हे.कॉ अंकुश ढवळे, पो.कॉ प्रकाश मांडगे, पो.कॉ.दादा टाके, पो.कॉ.गोकुळ इंगवले, किरण बोराडे, पो.कॉ. प्रकाश दंदाडे यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे