पुणे दि १६ : – पुणे शहरात विकेंड लॉकडाऊन सुरू झाला आहे. आता शुक्रवारी सांयकाळी ६ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत काय निर्बंध असतील. कारण राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. तिचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन पुणे शहर पोलिसांनी केले आहे.
शनिवार, रविवार काय सुरू राहणार
– दूध विक्री (सकाळी ७ ते ११)
– घरेलू कामगारांची कामे, रुग्ण सेवेसाठी जाणारे कामगार, वाहनचालक (ड्रायव्हर), स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिकांना सेवा देणारे
– लसीकरण सुविधा
– क्लिनिक, औषध विक्री
– स्विगी, झोमॅटोवरून पार्सल
– अत्यावश्यक सेवेशी संबंधित उद्योग
– अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि घरेलू कामगार, प्रवासी, लसीकरणाला जाणारे नागरिक यांच्यासाठी पीएमपीची वाहतूक
– अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक
– रिक्षा, कॅब
– बांधकाम साईटस (मजूर तेथे राहत असतील तर)
– वृत्तपत्र छपाई आणि वितरण
बंद काय असेल
– किराणा, मटण, चिकण दुकाने
-भाजी मंडई,
-हॉटेल्स, रेस्तराँ, सिनेमागृहे, थिएटर, मॉल
– चित्रपट, मालिकांचे शूटिंग
-सलून, ब्यूटी पार्लर, जीम