पिंपरी चिंचवड दि ०६: – पुणे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यातील ‘वाईन शॉप’देखील बंद केल्याने मंगळवार पासून (दि.६) पुण्यातील तळीरामांनी मोर्चा मद्यखरेदीसाठी थेट पिंपरी-चिंचवडचा रस्ता धरला. पिंपरी-चिंचवडमधील वाईनशॉप देखील बंद होणार असल्याने अफवेने ‘वाईन शॉप’समोर अक्षरश: झुंबड उडाली. ही बाब लक्षात येताच मद्यप्रेमींची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. व काही जणांचा विना मात्र पाचशे रुपये दंड हि वसुल करण्यात आले आहे त्यानंतर शहरातील काही वाईनशॉप बंद ठेवण्यात आले आहेत.राज्य सरकारच्या निर्बंधांनंतर पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी पुणे शहराकरिता स्वतंत्र निर्बंध लागू केल्याचे जाहीर केले.या नव्या नियमावलीनुसार त्यानुसार मंगळवारपासून पुणे शहरातील अत्यावश्यक सेवावगळता येत्या 30 एप्रिलपर्यंत ‘वाईन शॉप’ देखील बंद राहणार आहेत.पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील वाईन शॉप खुली असल्याने पुण्यातील मद्यप्रेमींनी खरेदीसाठी वाईनशॉपसमोर सकाळपासूनच मोठी गर्दी केल्याचे चित्र होते. त्यातच पिंपरी-चिंचवड शहरातील वाईनशॉपदेखील बंद होणार असल्याची अफवा पसरल्याने स्थानिक मद्यप्रेमींदेखील या गर्दीत खरेदीसाठी सहभागी झाले.
परिणामी शहरातील अनेक वाईनशॉपसमोर मद्यप्रेमींची तोबा गर्दी झाली. ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांच्या सूचनेनंतर गर्दी झालेली वाईनशॉप बंद करण्यात आली. परिणामी, मद्यप्रेमींची मोठी निराशा झाली. तर अनेकांनी आपला मोर्चा गर्दी नसलेल्या उपनगरांमधील वाईनशॉपकडे वळविल्याचे चित्र दिसत होते.