श्रीगोंदा दि २४:- मढेवडगाव- रयत शिक्षण संस्थेची शताब्दी वर्ष संपत असताना रयत शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल, मढेवडगाव हे पन्नास वर्षात म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना संस्थेच्या धोरणानुसार कोरोना संसर्गामुळे ऑनलाइन एज्युकेशन च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची व शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या अभ्यासक्रमाची जय्यत तयारी करून विद्यार्थी अध्यापन जोरात चालू आहे.
विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विद्यालयाच्या जागेवर G+2 ची अंदाजे दीड कोटी रुपयांची इमारत बांधण्याचा संकल्प ग्रामस्थांच्या माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने बांधण्याचे नियोजन संस्थेच्या माध्यमातून विद्यालयाने केलेले आहे. पैकी ग्राउंड फ्लोअर चे बरेचसे काम पूर्ण होत आलेले आहे व पहिल्या मजल्याचे अंदाजे 46 लाख रुपयांचे काम या सुवर्णमहोत्सवी वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न थोर देणगीदारांच्या व संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा चंग वारकरी संप्रदायाच्या वयोवृद्ध ग्रामस्थांनी व देणगीदारांनी मनावर घेतलेला आहे.
३ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या नियोजनानुसार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून गावातील वारकरी मंडळींनी ग्रामदैवतांची आकर्षक मंदिरे लोकवर्गणी जमा करून बांधलेल्या वारकऱ्यांनी ज्ञान मंदिर बांधकामासाठी लोकवर्गणी करण्याचा निर्णय घेतला, स्कूल कमिटी व सर्व समित्या सदस्यांची ६ जानेवारी २०२१ला बैठक घेऊन वर्गणी करण्यासाठी घरोघरी जाण्याचा निर्णय घेतला. शैक्षणिक काम करण्यासाठी समाज सुधारणेचा वसा घेतलेले पांडुरंगाचे भक्त भाऊराव पाटलांच्या रयतेचे ज्ञान मंदिर उभारणीसाठी पुढे सरसावले. शाखेचे मुख्याध्यापक नवनाथ बोडखे,पर्यवेक्षक हौसराव दांगडे व सर्व सेवक वृंद तसेच सर्व वारकरी मंडळ यांची नियोजनासाठी एकत्र बैठक पार पडली. रयतच्या ज्ञानमंदिर उभारणीसाठी पांडुरंगाचे भक्त व रयत सेवक धरोघरी जाण्याच्या आनंददायी निर्णय झाला.
दररोज संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत वाड्या-वस्त्यांवर व गाव परिसरात थंडीवा-याची तमा न बाळगता चिकाटी धरून हे वयोवृद्ध वारकरी व शाळेचे शिक्षक तसेच शाळेतील विध्यार्थी ओंकार शिंदे तसेच माजी विद्यार्थी सुहास शिंदे सारखे हरहुन्नरी विद्यार्थी,परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिक एकत्र येऊन दररोज नित्यनियमाने घरोघरी जाऊन परिस्थितीनुसार २०००,५०००,११००० अशा देणग्या पावत्या व आभार पत्र देऊन प्रेमाने ज्ञानमंदिरा साठी लोक वर्गणी जमा करत आहेत. दिनांक ३जानेवारी २०२१ ला वर्गणीचा नारळ फोडला व १३फेब्रुवारी २०२१ अखेर विठ्ठलाचे वारकरी ह. भ. प. खंडेश्वर झिटे,माणिकराव मांडे,ज्ञानदेव बनकर,शंकर मांडे,लक्ष्मण मांडे, सुखदेव धावडे, ज्ञानदेव गाडे,काशिनाथ मांडे, रामदास शिंदे, राजेंद्र शिंदे, माधव गरड, लक्ष्मण सोनबा मांडे, गिरवले साहेब, महिला बचत गटाच्या नंदिनीताई वाबळे, प्रतिभा उंडे, सुनिता उंडे, कल्याणी गाढवे ह्या महिला पण सहभागी होतात. तसेच शाखेतील सेवक पर्यवेक्षक हौसराव दांगडे सर ,संजय पानसरे सर, ,पवार.आर.एस, पवार .ए.एल, शिंदे एम डी,शेळके आर .टी ,श्री नलगे सर,काळोखे सर,भोईटे एस.एम,कोकाटे सर,लेंडे सर, वंजारे सर, शंकर यदलोड सर,सुपेकर सर,,घोडे सर, दिघे सर,ननवरे सर, इंगळे मामा,शिरोळे मामा,हे दररोज घराघरात जाऊन ज्ञान मंदिराच्या उभारणीसाठी लाखो रुपयांच्या देणग्या जमा करत आहेत.ही घरोघरी जाण्याची संकल्पना शाळेतील ध्येयवेडे शिक्षक म्हणुन ज्यांची कोरोना काळात गावाला ओळख निर्माण झाली असे शंकर सिद्राम यदलोड सर यांनी मांडली.आज अखेर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून विद्यालयावर प्रेम करणाऱ्या शाखा हितचिंतकाकडून जवळपास ६ लाख ११००० लोकवर्गणी जमा झालेली आहे.
ग्रामस्थ लोकवर्गणी, माजी विद्यार्थी लोकवर्गणी जमा होत असल्याने संस्थेने ग्रामस्थाप्रती समाधान व्यक्त केले आहे.देणगीदारांना देणगी पावती व आभार पत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. देणगीदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मॅनेजिंग कौन्सिलचे तुकाराम कण्हेरकर साहेब, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, सहसचिव मान.संजय नागपुरे साहेब यांच्यामार्फत विद्यालयास पंधरा लाख रुपयाचा इमारत बांधकाम निधी
मिळाला आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी त्यांना धन्यवाद दिले. सुवर्ण महोत्सवी वर्षात माजी विद्यार्थी यांना सुद्धा प्रेरणा मिळालेली आहे. तेसुद्धा इमारत बांधकामासाठी भरभरून मदत करत आहेत.त्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
जवळपास ८ लाख रुपये देणग्या प्राप्त झालेल्या आहेत. इमारत बांधकामांसाठी व शालेय गुणवत्ता वाढीसाठी ग्रामस्थांचे विशेष सहकार्य मिळते त्याबद्दल विद्यालयाचे सर्व सेवक व मुख्याध्यापक नवनाथ बोडखे ऋणात राहणे पसंत करत आहेत.संस्थेच्या वतीने सर्व देणगीदार व वारकरी सांप्रदायातील वयोवृद्ध सदस्य यांना मनापासून धन्यवाद देण्यात येत आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे