पुणे : क्रिकेटची आवड असणाऱ्या आणि क्रिकेटमध्ये आपले भविष्य घडवू पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी शहराच्या नामवंत ठिकाणी इनडोअर क्रिकेट क्लबची स्थापना केली आहे. कोथरूड येथील म्हातोबा नगर येथे नुकत्याच सुरू केलेल्या साई एम जे स्पोर्ट्स अकॅडमीने जम बसविला आहे.
येथे महिन्यातून एकदा फिटनेस ट्रेनिंग, फिटनेस कॅम्प घेतले जातात. त्यामध्ये डाएट सल्लागार मुलांना मार्गदर्शन करतात. या मार्गदर्शनानुसार आहार, आरोग्य आणि क्रिकेटचा मेळ साधून सदस्य खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. असाच एक सदस्यत्व ट्रायल कॅम्प काल (ता. २१) साई एम जे स्पोर्ट्स अकॅडमी येथे आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पच्या निवड समितीमध्ये महाराष्ट्राचे रणजी खेळाडू पराग मोरे, महाराष्ट्र क्रिकेटर आणि कॅम्प अकॅडमीचे प्रशिक्षक संदीप लेले आणि महाराष्ट्र क्रिकेटर रोहित काकडे अशा क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा समावेश होता. यावेळी फक्त पुण्यातीलच नाही तर बारामती, मंचर यांसारख्या अनेक बाहेरील शहरांतून विद्यार्थी उपस्थित होते.
या अकॅडमीमध्ये कोरोना काळात आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेऊन शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने मुलांनी सदस्यत्व घेणे अधिक फायद्याचे ठरेल. या काळात नेहमी सारखीच अकॅडमीच्या स्वच्छतेची काटेकोरपणे काळजी घेतली जात असून रोज सॅनीटायजरने निर्जंतुकीकरण केले जाते. याशिवाय क्लबमध्ये मजबूत खेळाडू घडवण्यासाठी उत्तम उपकरणे आणि उत्तम साहित्याचा वापर केला जातो. तसेच मुलींना विशेष प्रशिक्षण देण्यासाठीही अकॅडमी प्रयत्नशील आहे.
लहानपणापासूनच क्रिकेटची आवड जोपासली आणि त्यात सातत्य ठेवले तर भविष्यात अनेक क्रिकेटवीर घडू शकतात. असे क्रिकेटवीर घडवण्याचे काम आमची अकॅडमी दर्जेदार प्रशिक्षण देऊन करते. साई एम जे अकॅडमीमध्ये गरजू आणि ग्रामीण भागातील मुलांना मोफत प्रशिक्षण तर दिले जातेच. परंतु एकोणीस वर्षाखालील मुलांना माफक दरात प्रशिक्षण दिले जाते. आपल्या शहरातील मुलांची क्रीडा विषयातील आवड देशविकासासाठी फायदेशीर ठरावी आणि कोथरूड भागातील मुलांना वाहतूक खर्चाची बचत होऊन घरापासून मोजक्या अंतरावर दर्जेदार आणि योग्य दिशा देणारे प्रशिक्षण मिळावे हा या क्लब निर्मिती मागचा हेतू असल्याचे अकॅडमी चे मुख्य संचालक महेंद्र जाधव यांनी सांगितले.
महेंद्र जाधव म्हणाले, भविष्यात सक्षम क्रिकेट टीम उभारण्यासाठी सदस्यत्व घेणाऱ्या सदस्यांची आवड आणि क्षमता यानुसार अकॅडमी निवड करणार आहे. एकदा सदस्यत्व घेणाऱ्या सदस्यांना आयुष्यभर फिजच्या दरात २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय मुलींसाठी विशेष बॅच तयार करण्यात येणार आहे. पाच वर्ष ते एकोणीस वर्ष किंवा त्या पुढील सर्व वयोगटातील कोणीही या संधीचा लाभ घेऊ शकतो.