पिंपरी चिंचवड दि २२ :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाकड पोलीस स्टेशन लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं छापा टाकत 50 हजार रुपयांची लाच घेताना एका पोलीस अंमलदाराला रंगेहात पकडले आहे. आज दि २२रोजी ही कारवाई झाली आहे.सचिन जाधव असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जाधव हे वाकड पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. दरम्यान यातील तक्रारदार याच्यावर 498 चा प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे . अटकेची प्रक्रीया करून जामिनावर सोडण्यासाठी व गुन्हयाचे दोषारोपपत्र लवकर पाठविण्यासाठी
दाखल आहे. यात मदत करण्यासाठी यांनी १ लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली होती.त्या नुसार या लाचेची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज तडजोडीअंती 50 हजार रुपयांची लाच घेताना जाधव यांना एसीबीने रंगेहात पकडला आहे.वाकड पोलीस स्टेशन , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे . गुन्हयाचा तपास श्रीमती अलका सरग , पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. पुणे युनिट करत आहेत .सदरची कारवाई . पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक . राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व . अपर पोलीस अधीक्षक. सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे , सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास १०६८ क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .