पुणे दि.०२ :-भारतीय जनता पार्टी , सहकार आघाडी पुणे शहर वतीने ” मोफत कायदेशीर सल्ला केंद्र “ चे ऊदघाटन भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांचे हस्ते भाजपा शहर कार्यालय , सन्मान हॅाटेल , पुणे येथे करण्यात आले . कार्यक्रमाचे संयोजन भाजपा सहकार आघाडी पुणे शहर अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी केले .
सर्वसामान्य पुणेकरांसाठी दर महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मोफत कायदेशीर सल्ला केंद्र सुरू करण्यात आले आहे . मान्यवर अभ्यासू कायदेपंडीतांचे मार्गदर्शन गृहरचना सोसायट्या , नागरी पतसंस्था , सहकारी बॅका यासोबत कौटुंबिक आणि इतर योग्य विषयावर मोफत सल्ला दिला जाणार आहे .
पुणे शहरात गृहनिर्माण संस्था ह्या १७९८४ इतक्या असुन फक्त २४८२ संस्थांनी डीम्ड कन्व्हेअन्स करून घेतले आहे . २१२५ गृहरचना संस्थाना डीम्ड कन्व्हेअन्स लागु होत नसले तरी बाकी ब-याच हजार संस्थांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि या साठी भाजपा सहकार आघाडी मदत करेल . पुणेकरांनी या समाजोपयोगी उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जगदिश मुळीक यांनी केले आहे .
दर महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भारतीय जनता पार्टी , पुणे शहर कार्यालय येथे हे मोफत कायदेशीर सल्ला केंद्र चालणार आहे . यासाठी सहकार आघाडी पुणे शहर यांनी तयार केलेल्या
https://surveyheart.com/form/6016afdc95ad364d0c2e51d0
लिंकवर आपल्याला आपल्या संस्थेची अथवा वैयक्तिक माहिती , अडचणी यांची माहिती पाठवायची आहे . ती लिंक सोशलमिडीयाच्या विविध माध्यमातुन पुणेकरांपर्यत पोहचविणार असल्याचे अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी सांगितले .
याप्रसंगी भाजपा पुणे शहर संघटन मंत्री रवि अनासपुरे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे , सरचिटणीस गणेश घोष , राजेश येनपुरे , प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे , युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्यासह नगरसेवक , शहर पदाधिकारी , सहकार आघाडीचे पदाधिकारी आणि विविध आघाडयांचे अध्यक्ष उपस्थित होते .