पुणे दि २६ :- पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वतीने २६ नोव्हेंबर मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्यात वीरमरण आलेल्या पोलीस अधिकारी व अमंलदार यांना श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम आयोजित आज दि २६ रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात २६/११/२००८ साली मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्यात वीरमरण आलेल्या पोलीस अधिकारी व अमंलदार यांना श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला .होता व कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमाचे या
वेळी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून पोलीस विभागात कर्तव्य बजावत असताना वीरमरण येणे ही एक अभिमानाचीच गोष्ट आहे . पोलीस अहोरात्र समाजाच्या सेवेसाठी जीवाची पर्वा नकरता आपले कर्तव्य बजावत आहेत , या वेळी त्यांनी कवि सिद्ध व नाथपंती यांच्या दोन ओव्यांचा उपदेश केला की , “ अच्छा हुवा की मेरा पती लढाईके मैदान में मारा गया .. मे तो लज्जेसे जमीनमे गढ जाती अगर वो लढाई के मैदान से भागकर घर वापस आता . ” पुराणकाळी युद्धासाठी क्षत्रियांची गरज लागत होती पण आता पोलीसच खरे योद्धे होवून दहशदवादी , दरोडेखोर , नक्षलवादी , समाजात दहशद निर्माण करणारे समाजकंटक व्यक्तींपासून समाजाचे रक्षण करत आहेत देशाची राज्याची आंतरिक सुरक्षा ही तुमच्याच हातात आहे , आता स्वस्त बसू नका समाजाचे रक्षण करणे वाईट वृत्तींचा नायनाट करणे हाच आपला परमधर्म आहे . तसेच आज
संविधान दिवस आहे संविधान हा देशाचा भक्कम पाया समजला जातो . संविधानाने आपल्याला दिलेला अधिकाराचा आपन नेहमी सन्मान केला पाहीजे असा मोलाचा संदेश देवून उपस्थित पोलीस अधिकारी व अमंलदार यांना मार्गदर्शन करून विरमरण प्राप्त झालेले पोलीस अधिकारी व अमंलदार यांना श्रद्धांजली अर्पण केली व रामनाथ पोकळे,अपर पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड यांनी २६/११ रोजी विरमरण प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे हुतात्म हे नेहमीच प्रत्येक पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे स्मरनाथ राहणार आहे . महाराष्ट्रात मुबंई येथे प्रथमच दोन दहशदवाद्यानां जिवंत पकडण्यात पोलीस दलाला यश आले.यात वीरमरण आलेल्या सर्वांचा महत्वाचा वाटा आहे असे बोलून वीरमरण प्राप्त पोलीस अधिकारी व अमंलदार यांना श्रद्धांजली अर्पण केली.सुधीर हिरेमठ यांनी दहशदवादी हल्यात वीरमरण आलेल्या हुतात्म्यांना श्रद्धाजंली अर्पण केली , तसेच आज भारतीय संविधान दिनानिमित्य सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार यांना संविधान वाचून शपत दिली . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय घोळवे यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे औचीत्य साधून देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम अक्षय घोळवे व संतोष महिश्वरी यांनी केला . या कार्यक्रम प्रसंगी मा.पोलीस आयुक्त. कृष्ण प्रकाश यांचेसह अपर पोलीस आयुक्त.रामनाथ पोकळे पोलीस उप – आयुक्त , गुन्हे . सुधीर हिरेमठ , पोलीस अप – आयुक्त , परिमंडळ १.मंचक इप्पर , सहायक पोलीस आयुक्त , गुन्हे.आर.आर. पाटील तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी २६/११ च्या दहशदवादी हल्यात वीरमरण प्राप्त झालेले पोलीस अधिकारी व अमंलदार यांना श्रद्धाजंली अर्पण केली . सदर या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन करण्यात आले होते .