पुणे दि २२ : – पुणे ससून रुग्णालय मध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्यास(सीएमओ) मारहाण करण्यात आल्या ची. घटना शनिवारी सकाळी 3 वाजून 20 मिनिटांनी रुग्णालयाच्या अपघात विभागात घडली.आहे व याप्रकरणी सोहन पवार(23), योगेश वाघमारे(22), सुरज वाघमारे(20), लीलावती वाघमारे(40, सर्व रा.खड्डा झोपडपटटी ताडीवाला रस्ता) यांच्या विरुध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सोहन, योगेश व सुरजला सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली आहे.
याप्रकरणी ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शंकरलाल चौधरी(25,रा.कॅम्प)यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे ससूनच्या अपघात विभागात वॉर्ड नं. ४० मध्ये कर्तव्य बजावत होते. यावेळी एक तरुणीला फीट आल्याने तीला दाखल करण्यात आले होते ते आत उपचार करत असताना बाहेर आरोपी असलेले तीचे नातेवाईक चप्पल व बुट घालून अपघात विभागात तीला बघायला गेले होते. तेव्हा सुरक्षा रक्षकाने त्यांना हटकून चप्पल व बुट घालून आत जाऊ नका , एकच जण रुग्णाजवळ थांबा अशी सूचना केली.याचा राग आल्याने आरोपींनी सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही भांडणे सोडवण्यासाठी डॉ.चौधरी बाहेर आले असता, त्यांनाही आरोपींनी धक्का-बुक्की केली. आरोपींच्या धक्का-बुक्कीमध्ये केबीनमधील संगणक व इतर साहित्याची तोडफोड झाली.
आरोपींमधील एकाच्या बहिणीवर उपचार सुरु असताना ते तेथे गर्दी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना हटकल्याने रागातून हा प्रकार झाला. अटक आरोपीतील एक महाविद्यालयीन विद्यार्थी आहे तर दुसरे दोघेही शिक्षण घेत असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक तुकाराम फड यांनी दिली. आहे