पिंपरी चिंचवड दि २१ :- कोरोनाच्या काळात पिंपरी चिंचवड शहरात दुसरा लॉकडाऊन घोषित करण्यात आला.यावेळी एका चॅनेल चे संपादक बापूसाहेब गोरे पिंपरी-चिंचवड परिसरात चौका-चौकात माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांनी मला ” चल सूट घरी ” असे म्हणत हात पाय तोडण्याची धमकी दिली.याबाबत तोंडी तक्रार तत्कालीन पोलीस आयुक्त व उपायुक्त यांच्याकडे केली होती.संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी ” रविंद्र जाधव यांच्या विरोधी लेखी तक्रार द्या” अशा सूचना केल्या मात्र पोलीस हा माणूस आहे.कामाच्या तणावाखाली अशी घटना घडू शकते. एक वेळ गप्प बसू मात्र पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव यांनी दुसऱ्या कोणत्याही पत्रकारांस पुन्हा त्रास दिल्यास मात्र त्यांच्याविरोधी रीतसर तक्रार करू या असे मी व माझे सहकारी पत्रकारांनी त्यावेळी ठरविले.त्यामुळे जाधव यांच्या विरोधी कसलीही तक्रार न करता पत्रकारांचे शिष्टमंडळ आयुक्त कार्यालयातून परत आले.
त्यानंतर पुढच्याच आठवड्यात २ पत्रकार यांच्या बाबतीत रवींद्र जाधव यांचे गैरवर्तन समोर आले.त्यावरून लेखी तक्रार करण्यात आली व माझीही जबानी घेण्यात आली.त्यामध्ये जाधव हे दोषी आढळले.
👉🏻 पत्रकारांशी अर्वाच्य भाषा!
निनावी मोबाईल क्रमांकावरून त्रास देणाऱ्या महिलेविरुद्ध ज्येष्ठ पत्रकार संतलाल यादव यांनी चिंचवड पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दिली.त्यावेळी त्यांच्या समवेत पत्रकार ओमप्रकाश पांडे हेही उपस्थित होते. “अर्जाबाबत विचारणा करायची आहे तुम्ही पोलीस स्टेशनला या” असा निरोप पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव यांनी पत्रकार संतलाल यांना दिल्यामुळे पत्रकार संतलाल हे चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यावेळी पत्रकाराला यांना रविंद्र जाधव यांनी दमबाजी केली.शिवाय त्याच रात्री मोबाईलद्वारे संतलाल यादव यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, त्यामुळे संतलाल यादव यांनी पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव यांच्या विरोधी लेखी तक्रार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली.सदरील अर्जामध्ये शहरातील तीन पत्रकारांना त्रास दिल्याचे नमूद केल्यावरून पोलीस आयुक्त प्रकाश कृष्णा यांनी अर्जाची गंभीरपणे दखल घेऊन सदरील प्रकरणाची सविस्तर चौकशीचे आदेश काढले. चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त मा मंचक इप्पर यांना दिले.
उपायुक्त मंचक इप्पार यांनी प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी केली. पत्रकार बापूसाहेब गोरे,संतलाल यादव व ओमप्रकाश पांडे यांचे लेखी जबाब घेण्यात आले.व तसा लेखी अहवाल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचेकडे सादर करण्यात आला.चौकशी अहवालात पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव दोषी आढल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करत जाधव यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढले.आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतलेल्या निर्णयाचे पत्रकार वर्गात स्वागत होत आहे.
पत्रकारांनी केलेल्या लेखी तक्रारीची गंभीरपणे दखल घेऊन त्याप्रकारणाची निःपक्षपातीपणे चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कमी वेळेत कडक कारवाई केल्यामुळे कृष्ण प्रकाश यांच्या स्वच्छ व पारदर्शक कार्य पद्धतीचे कौतुक केले जात आहे.