पुणे ग्रामीण दि ०२ :-दि 1/09/2020 रोजी रात्री 10 च्या दरम्यान दौंड कुररकुंभ मार्गावरील राज्य राखीव पोलीस बल गट एस आर पी एफ गट क्र. ७ मधील राज्य राखीव पोलीस पब्लिक स्कुल (मुन्ना बालवाडी) शाळेच्या आवारात बिबट्या दिसून आला आहे त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली . तरी सर्वांनी सतर्क राहा दार खिडक्या व्यवस्तीत लावून घ्या काळजी घ्या घरातच राहा असा सतर्कतेचा इशारा दौंड प्रशासनाकडून देण्यात येत आहे.येथील वनविभाग आधिकरी व कर्मचारी, एस आर पी एफ जवानांनीही मदत घेतली जात आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. जोपर्यंत तो पकडला जात नाही तोपर्यंत नागरिकांनी स्वतः काळजी घ्यावी असे स्पीकर च्या माध्यमातून सागितले जात आहे.हा विभाग डोंगरी व फॉरेस्ट विभाग असून त्या ठिकाणी मोठं तलावही आहे.भक्षाच्या शोधत आला असावा असं सांगण्यात येत आहे.
दौड प्रतिनिधी :-प्रा. महेश देशमाने