पुणे दि. ०७ :- महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या कंपनी व्यवस्थापना बरोबर चर्चा निष्फळ झाल्याने महाराष्ट्र राज्य कंत्राटी विज कामगार संघाच्या कंत्राटी कामगारांनी आजपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.या बंदमध्ये राज्यातील सुमारे 22 हजार कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत .विविध मागण्यासंदर्भात तिन्ही वीज कंपनीच्या प्रतिनिधींनी बरोबर चर्चा निष्फळ ठरल्याने कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या रोजगार आणि अन्य विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने आज राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केले आहे .पुण्यातील रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयासमोर या कंत्राटी कामगारांनी सरकार विरोधात घोषणा देऊन बंद आंदोलन सुरू केले.कंत्राटदार विरहित शास्वत रोजगाराची हमी आणि सुरक्षा कंपनीने द्यावी चालू भरती प्रक्रियेत बदल व्हावेत भरती मध्ये वर्षानुवर्षे रिक्त पदांवर काम करणाऱ्या अनुभवी कंत्राटी कामगारांना प्राधान्य मिळावे अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली .